कोरोना लसीवरील संशोधनाला भारतात मोठा ब्रेक; सीरम इन्स्टिट्यूटने ट्रायल्स थांबवल्या

ताज्या घडामोडी महाराष्ट्र

पुणे : सीरम इन्स्टिट्यूटने देशातील कोरोना लसीवरील ट्रायल्स थांबवल्या आहेत. एका निवेदनाद्वारे त्यांनी ही माहिती दिली आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने म्हटले आहे, की “आम्ही परिस्थितीचा आढावा घेत आहोत, अ‍ॅस्ट्रॅजेनेका चाचण्या पुन्हा सुरू करेपर्यंत भारताच्या चाचण्या थांबवित आहोत. आम्ही डीसीजीआयच्या सूचनांचे पालन करीत आहोत. त्यामुळे यापुढे यावर भाष्य करणार नाही. या संदर्भात अधिक माहितीसाठी डीसीजीआयशी संपर्क साधावा.

जगभरात कोरोनाव्हायरसचा कहर सुरु असल्याचं बऱ्याच देशांमध्ये यावरील लस लवकरात लवकर निर्माण करण्याचं काम सुरु आहे. परंतु कोरोना व्हायरसमुळे आलेल्या महामारीचा सामना करण्याच्या प्रयत्नांना मोठा झटका बसला आहे. कोरोनाव्हायरसच्या खात्‍म्यासाठी सर्वाधिक अपेक्षा वाढवलेल्या ऑक्‍सफर्डच्या AZD1222 लसीची तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील चाचणी रोखण्यात आली आहे. ब्रिटनमध्ये एका व्यक्तिला ऑक्‍सफर्डने बनवलेली कोरोनाव्हायरसवरील लस टोचण्यात आली होती. त्याच्या शरारीवर दुष्परिणाम झाल्याचं समोर आलं. यानंतर ही कोरोना लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी थांबवण्यात आली आहे. मात्र, भारतातील चाचण्या सुरुच राहणार असल्याने सीरम इन्स्टिट्यूटने काल सांगितलं होतं. मात्र, आज पुन्हा या चाचण्या थांबवण्यात आल्याचे सांगितले आहे.

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि ब्रिटिश-स्वीडिश कंपनी अॅस्ट्राजेनिकाची ही लस संपूर्ण जगासाठी आशेचा किरण बनली होती. ब्रिटनमध्ये या लसीच्या तिसऱ्या टप्प्याच्या चाचणीदरम्यान एका व्यक्तीच्या शरीरावर गंभीर दुष्‍परिणाम दिसू लागले. गंभीर दुष्परिणाम म्हणजे लस किंवा औषध दिल्यानंतर त्याला रुग्णालयात जावं लागलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *