कोरोना संक्रमित तरुणीवर रुग्णवाहिकेतच बलात्कार, नंतर सोडलं कोविड सेंटरमध्ये

ताज्या घडामोडी देशविदेश

केरळ : माणूसकीला काळीमा फासणारा बलात्काराचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका रुग्णावाहिकेच्या चालकाने कोविड-19 संक्रमित 19 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना केरळच्या पटनमिठ्ठाच्या अरममुला परिसरात घडली असल्याची माहिती देण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी आरोपी रुग्णवाहिका चालकाला अटक केली असून त्याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणीसह रुग्णवाहिकेमध्ये आणखी एक रुग्ण होता. त्याला आधी उतरवलं आणि त्यानंतर तो एका अज्ञात स्थळी गेला. तरुणीला रुग्णवाहिकेत एकटं पाहून त्याने तिच्यावर बलात्कार केला आणि त्यानंतर तिला कोविड केअर सेंटरमध्ये सोडलं.

खरंतर, देशात कोरोना संक्रमणाचा प्रकोप होत आहे. अशात ही घटना म्हणजे संपूर्ण व्यवस्थेसमोर प्रश्न आहे. तरुणीला कोविड सेंटरमध्ये दाखल केल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आणि त्यानंतर आरोपी चालकाचा शोध घेत त्याला अटक करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *