कोरोनावर भारताची पहिली लस 73 दिवसांत मिळणार असल्याचा दावा; केद्रांकडून मोफत लसीकरण!

ताज्या घडामोडी देशविदेश

नवी दिल्ली : भारताची पहिली कोरोना लस ‘कोविशिल्ड’ 73 दिवसांत बाजारात उपलब्ध होईल, असा दावा सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. कोविशिल्ड ही पुण्यातील बायोटेक कंपनी सीरम इन्स्टिट्यूटने विकसित केली आहे. पुणे येथील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी बिझनेस टुडेला मुलाखत देताना हा दावा केला आहे.

ते म्हणाले, भारत सरकारने आम्हाला विशेष संशोधन प्राधान्य परवाना दिला आहे. या अंतर्गत, आम्ही चाचणी प्रोटोकॉलची प्रक्रिया वेगवान केली आहे जेणेकरुन चाचणी 58 दिवसात पूर्ण होईल. अशा प्रकारे, तिसर्‍या टप्प्यातील चाचणीचा पहिला डोस देण्यात आला आहे. दुसरा डोस 29 दिवसांनी दिला जाईल. चाचणीचा अंतिम डेटा दुसरा डोस दिल्यानंतर 15 दिवसांनंतर येईल. यानंतर आम्ही कोविशिल्डला व्यावसायिक वापरासाठी बाजारात आणण्याचे विचार करत आहोत असे ते म्हणाले. यापूर्वी या लसीची चाचणी पूर्ण होण्यासाठी 7 ते 8 महिने लागतील असं सांगितले जात होते.

22 ऑगस्टपासून 1600 लोकांवर चाचणी

या लसीची चाचणी होण्यासाठी 7-8 महिन्यांचा कालावधी लागेल असे सांगितले जात होते. परंतु सध्या 17 सेंटरवरील 1600 लोकांवर 22 ऑगस्टपासून चाचणी करण्यात येत आहे. प्रत्येक सेंटरवर 100 स्वयंसेवक आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही लस सीरम इंस्टिट्यूटची असणार आहे. कंपनीने अ‍ॅस्ट्रा झेनेका नावाच्या कंपनीकडून ही लस तयार करण्याचे अधिकार विकत घेतले आहेत. जेणेकरून सीरम इंस्टीट्यूट ही लस भारत आणि जगातील इतर 92 देशांमध्ये विकेल. त्या बदल्यात सीरम इन्स्टिट्यूट अ‍ॅस्ट्रा झेनेकाला रॉयल्टी फी देणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *