शास्त्रज्ञांना सर्वात मोठं यश, कोरोनाला रोखणारी तब्बल 21 औषधं सापडली

ताज्या घडामोडी देशविदेश

नवी दिल्ली : जगभरात कोरोना थैमान घालत आहे. दुसरीकडे जगभरातील शास्त्रज्ञ कोरोनावर लस शोधण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र या सगळ्यात शास्त्रज्ञांच्या एक यश मिळालं आहे. शास्त्रज्ञांना अशी 21 औषधं सापडली आहेत जी कोरोना विषाणूची प्रसार रोखू शकतात. म्हणजे, ही औषधे कोरोना विषाणूचे एकमेकांमध्ये होण्यापासून रोखू शकतात. सॅनफोर्ड बर्नहॅम प्रीबिस मेडिकल डिस्कवरी इन्स्टिट्यूट ऑफ अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनी हे संशोधन केले आहे.

शास्त्रज्ञांनी केलेले हे संशोधन कोरोना विषाणूच्या उपचारात मदत करू शकते. कोरोना विषाणूची प्रतिकृती रोखण्यासाठी शास्त्रज्ञांनी औषधांचे विश्लेषण केले. लॅब टेस्टमध्ये अँटीव्हायरल अॅक्टिव्हिटी असलेले 100 रेणू (molecules) आढळले. हा अभ्यास नेचर जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला आहे. प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार यातील 21 औषधं विषाणूचे पुन्हा निर्माण होण्यास प्रतिबंध करतात आणि ही औषधे रुग्णांसाठी सुरक्षित आहेत. यापैकी चार कंपाउंड रेमडेसिव्हिरसोबत एकत्रित करून COVID-19 चा उपचार केला जाऊ शकतो.

रोग प्रतिकारशक्ती कार्यक्रमाचे संचालक सुमित चंदा यांनी सांगितले की, “रेमेडिसिव्हिर औषधं रुग्णालयात रूग्णांचा रिकव्हरी वेळ कमी करण्यास सक्षम आहे, मात्र हे औषध सर्व लोकांवर समान निकाल दाखवत नाही”. ते म्हणाले की अद्यापही स्वस्त, प्रभावी आणि सहज उपलब्ध औषधे आहेत जी रेमेडिसिव्हिरसारखी काम करू शकतात.

या 21 औषधांची झाली तपासणी

या अभ्यासामध्ये, वैज्ञानिकांनी कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तींच्या फुफ्फुसांच्या बायोप्सिसवरील औषधांच्या परिणामाची देखील तपासणी केली. या व्यतिरिक्त, रेमेडिसिव्हिरसह इतर औषधांचे मूल्यांकन देखील तपासले गेले. शास्त्रज्ञांना असे आढळले आहे की या 21 औषधांमधून कोरोनाती प्रतिकृती होण्यापासून रोखणारी 13 औषधे क्लिनिकल ट्रायलमध्ये आहेत. असे मानले जाते की COVID-19 रूग्णांवर उपचार करण्यास ते प्रभावी आहेत. शास्त्रज्ञांनी सांगितले की यापैकी 2 जणांना यापूर्वीच अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मान्यता दिली आहे. ही औषधे एस्टेमिझोल (Astemizole) आणि क्लोफाझॅमिन (Clofazamine) आहेत, तर आपत्कालीन परिस्थितीत रेमेडिसिव्हिर वापरण्यासाठी मंजूरी देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *