कोरोनाच्या लढाईमध्ये भारताला जगभरातून साथ

ताज्या घडामोडी देशविदेश

नवी दिल्ली : कोरोनाच्या महामारीने आता देशात हाहाकार माजवला आहे. आता रोजची रुग्णवाढ ही चार लाखांच्या घरात पोहोचली आहे. गेल्या काही दिवसांत देशभरात ऑक्सिजन आणि इतर साहित्यांचा तुटवडा जाणवत असून त्यामुळे हजारो रुग्णांचा जीव जात आहे. भारताच्या या संघर्षाला आता जागतिक स्तरावरून साथ मिळत असून अमेरिका, ब्रिटन सहित जवळपास 40 देशांतून मदतीचा ओघ सुरु झाला आहे.  आतापर्यंत भारतात आंतरराष्ट्रीय मदत घेऊन 25 फ्लाईट्स आल्या आहेत. त्यामध्ये ऑक्सिजन आणि इतर कोरोनाच्या साहित्यांचा समावेश आहे. 

कोणत्या देशाने काय मदत केली? 

नेदरलॅन्ड
नेदरलॅन्ड या देशाने भारताला 449 व्हेन्टिलेटर्स, 100 कॉन्सन्ट्रटर्स आणि इतर मेडिकल सप्लाय केला आहे. येत्या काही दिवसांत या मदतीत आणखी वाढ करण्यात येणार आहे. 

स्वित्झरलँड
स्वित्झरलँडने भारताला 600 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स, 50 व्हेन्टिलेटर्स आणि इतर मेडिकल साहित्यांचा सप्लाय सुरु केला आहे. हे साहित्य घेऊन एक फ्लाईट आज सकाळी भारतात पोहोचली आहे.

ब्रिटन
ब्रिटनकडून 4 मेला भारताला ऑक्सिजन सिलेंडर्सचा पुरवठा करण्यात आला आहे. येत्या काही दिवसात इतरही साहित्यांची मदत करण्यात येणार आहे. 

अमेरिका
अमेरिकेने आतापर्यंत सहा फ्लाईट्स भरून कोरोनाचे साहित्य भारताकडे पाठवलं आहे. रताच्या या कोरोना विरोधातल्या लढ्यामध्ये अमेरिका भारताला शक्य तितकी मदत करेल आणि भारताच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिल असं व्हाईट हाऊसच्या एका निवेदनात सांगण्यात आलं आहे. त्याचाच एक भाग म्हणून भारताला 7.41 अब्ज रुपयांच्या कोरोना संबंधित साहित्यांचा पुरवठा करण्यात येणार आहे. या साहित्यामध्ये 1000 ऑक्सिजनचे सिलेंडर, 1.5 कोटी N-95 मास्क आणि दहा लाख रॅपिड डायग्नोस्टिक चाचण्या यांचा समावेश आहे. 

इतर काही देश
भारताला 3 मे पर्यंत 14 देशांकडून इमर्जंन्सी सप्लाय मिळाला आहे. यामध्ये ब्रिटन, मॉरीशस, सिंगापूर, रशिया, यूएई, आयरलँड, रोमानिया, थायलँड, अमेरिका, जर्मनी, उजबेकिस्तान, फ्रांस, इटली आणि बेल्जियम या देशांचा समावेश आहे. 

विदेशातून काय मदत आली? 

 • ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर – 1,676
 •  व्हेन्टिलेटर – 965
 •  ऑक्सिजन सिलेंडर  – 1,799
 •  ऑक्सिजन सिलेंडर अॅडेप्टर -20
 •  ऑक्सिजन जनरेटिंग प्लांट  – 1
 •  ऑक्सीजन थेरेपी डिव्हाइस – 20
 •  बेडसाइड मॉनिटर – 150  
 •  BiPAPs, कवरऑल, गॉगल आणि मास्क – 480
 •  पल्स ऑक्सिमीटर – 210
 •  रॅपिड डायग्नोस्टिक किट – 8,84,000
 •  N-95 फेस मास्क – 9,28,800
 •  रेमडेसिवीर – 1,36,000
 •  इलेक्ट्रिक सीरिंज पंप – 200
 •  AFNOR/BS फ्लेक्सिबल ट्यूब – 28
 •  अॅन्टी बॅक्टेरियल फिल्टर – 500
 •  मशीन फिल्टर आणि पेशंट सर्किट – 1000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *