कोविड सेंटरमध्ये रुग्णांची आत्महत्या

ताज्या घडामोडी सोलापूर

6:37 AM (0 minutes ago)
to me

बार्शी जनसत्य प्रतिनिधी :

श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ यांचे बार्शी येथील पॉलीटेक्निक कॉलेज या ठिकाणी कोबीड केअर सेंटर उभारण्यात आलेले आहे. या कोवीड केअर सेंटर मध्ये पॉझिटिव्ह रुग्ण औषध उपचार घेत आहेत.    आज दिनांक ६ एप्रिल रोजी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास सदरच्या सी सी सी मध्ये औषध उपचार घेणाऱ्या पेशंट नामे उमेश भागवत कोंढारे वय ३७ वर्ष राहणार चिखर्डे तालुका बार्शी याने संबंधित बिल्डिंगच्या पहिल्या माळ्यावर साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.  संबंधित मयत इसम उमेश कोंढारे हा दिनांक ३१ मार्च रोजी करोना पॉझिटिव्ह आलेला होता व चार दिवस त्याने त्याचे घरीच औषध उपचार घेतले होते. त्यानंतर त्यास अस्वस्थ वाटू लागल्याने दिनांक 3 एप्रिल पासून बार्शी येथील कोविड केअर सेंटरमध्ये औषध उपचारासाठी दाखल केले होते. त्याचबरोबर त्याच्या घरातील कुटुंबीय त्याची आई पत्नी व दोन मुले यांचीदेखील तपासणी केली असता तर ते देखील पॉझिटिव्ह आल्याने त्यांना देखील त्याच सीसीसी मध्ये औषधोपचारासाठी दाखल केलेले होते.            काल दिनांक ५ एप्रिल रोजी सायंकाळपासूनच सदर मयती संहा बडबड करत होता तसेच त्यांच्या कुटुंबीयांकडे माझे काही खरे नाही मी आता जगत नाही मला टेन्शन आले आहे माझ्या मुलांना व्यवस्थित सांभाळा व तुम्ही व्यवस्थित राहा अशाप्रकारची बडबड करत होता. आज पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास त्याने संबंधित बिल्डिंगच्या वरील मजल्यावर असणाऱ्या बाथरूम जवळ साडी च्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
    याबाबत मयत याची आई व पत्नी यांचे व्हिडिओ ग्राफी केलेले जबाब नोंदविण्यात आले आहेत. त्यांनी वरील हकीकती प्रमाणेच जबाब मध्ये माहिती सांगितली असून त्यांची कुणाविरुद्ध ही संशय अगर तक्रार नसल्याचे सांगितले आहे. घटनेची माहिती मिळताच प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली

ReplyForward

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *