करोनामुक्त झाल्यावरही गर्भवतीला रुग्णालयात प्रवेश नाकारला, जुळ्यांचा मृत्यू

ताज्या घडामोडी देशविदेश

लप्पुरम: राज्यातील मलप्पुरममध्ये  बरा झाला असतानाही एका गर्भवती महिलेला एका रुग्णालयाने उपचार नाकारले. यामुळे या महिलेच्या जुळ्या मुलांचा मृत्यू झाला. ही गर्भवती महिला करोनातून बरी झाल्यानंतर तिला रुग्णालयाने १५ सप्टेंबरलाच घरी सोडले होते, अशी माहिती महिलेच्या कुटुंबीयांनी दिली. या महिलेला प्रसुतीसाठी रुग्णालयात दाखल करण्यासाठी तिच्या पतीला १४ तास धावाधाव करावी लागली. खासगी रुग्णालयांनीच नाही, तर सरकारी रुग्णालयांनी देखील या महिलेला प्रवेश नाकारल्याची माहिती तिच्या कुटुंबीयांनी दिली.

या महिलेच्या पतीचे नाव एन. सी. शरीफ असे असून ते पत्रकार आहेत. आपल्या पत्नीला रुग्णालयात प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी दोन जिल्ह्यांमधील रुग्णांलयांना विनंती करत राहिले. मात्र त्यांच्या पत्नीला वेळेवर उपचार मिळू शकले नाहीत. शेवटी त्यांच्या पत्नीला कोझिकोड मेडिकल रुग्णालयात प्रवेश मिळाला.

केरळच्या आरोग्य मंत्री के. के. शैलजा यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. ही चौकसी आरोग्य विभागाचे सचिवांमार्फत करण्यात येत आहे. ही घटना अत्यंत दु:खदायक असून यासाठी जबाबदार असलेल्यांविरोधात कठोर करवाई केली जाईल, असे आरोग्य मंत्री शैलजा यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

आपले रुग्णालय फक्त कोविड-१९च्याच रुग्णांसाठी असल्याचे सांगत मंजरी मेडिकल कॉलेजने महिलेला प्रवेश नाकारला, अशी माहिती महिलेच्या पतीने दिली. महिलेला प्रथम येथेच दाखल करण्यात आले होते, मात्र नंतर त्यांना पोटात दुखणे सुरू झाले नसल्याचे कारण देत त्यांना घरी सोडण्यात आले.तर, या पूर्वी एका खासगी रुग्णालयाने कोविड-१९ च्या संभाव्य संसर्ग लक्षात घेत या महिलेवर उपचार करण्यास नकार दिला होता. एका सरकारी रुग्णालयाने या महिलेला मंजरी रुग्णालयात नेण्यात यावे, अशी शिफारस केली होती. मात्र तेथे या महिलेला उपचार मिळू शकले नाहीत. त्यानंतर महिलेला तेथून अन्य एका रुग्णालयात जाण्यास सांगण्यात आले. कोझीकोडच्या आणखी एका रुग्णालयाने मंजरी मेडिकल कॉलेजने दिलेला निगेटीव्ह एंटीजनचा दाखला घेण्यास नकार दिला होता आणि RT-PCR चाचणी रिपोर्ट आणण्यास सांगितले होते. तर दुसरीकडे आमच्या रुग्णालयात गायनॅकोलॉजीस्ट उपलब्ध नसल्याचे कारण दिले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *