सोलापुरातील ग्रामीण भागात कोरोनाचा कहर;345 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह

ताज्या घडामोडी सोलापूर


सोलापूर : सोलापुरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. शहर आणि जिल्ह्यात रॅपिड अँटिजन टेस्ट सुरु झाल्यापासून रुग्णांचे निदान होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. ग्रामीण भागात सोमवारी प्राप्त अहवालानुसार एकाच दिवसात तब्बल 345 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढलले आहेत. तर 10 जणांचा मृत्यू झाला आहे.

ग्रामीण भागात वाढत्या कोरोनाच प्रादुर्भाव लक्षात घेता पंढरपूर परिसरात 13 ऑगस्ट पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. पंढरपुरात आज प्राप्त अहवालानुसार एकाच दिवसात 124 रुग्णांची भर पडली आहे. तर दोघांनी आपला प्राण गमावला आहे. तर आतापर्य़ंत बार्शी तालुक्यात ग्रामीण भागातील सर्वाधिक रुग्णांनी जीव गमावला आहे. बार्शी तालुक्यात आज 50 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आहेत तर दोघांनी आपला जीव गमावला आहे.

बार्शी तालुक्यात आतापर्यंत 1198 जणांना कोरोनाची लागण आहे. तर 50 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर पंढरपुरात ग्रामीण भागात सर्वाधिक रुग्णांची संख्या आहे. पंढरपुरात आतापर्यंत 1085 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह तर 26 जणांचा मृत्यू झाला आहे. अक्कलकोट तालुक्यात आतापर्यंत 561 पॉझिटिव्ह तर 28 जणांचा मृत्यू झाला आहे. करमाळा तालुक्यात 268 पॉझिटिव्ह आणि 3 जणांचा मृत्यू झाला आहे. माढा तालुक्यात 427 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 11 जणांनी आपला जीव गमावला.

 सोमवारी दुपारी प्राप्त अहवानुसार सोलापुर शहरात काल 480 रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 442 जणांचे अहवाल हे नेगेटिव्ह आढळले आहेत. तर 38 रुग्णांचे अहवाल हे पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. तर शहरातील तिघांचा मृत्यू देखील कोरोनामुळे झाला आहे. सोलापूर शहरात आतापर्यंत 39224 जणांची तपासणी करण्यात आली आहे. यापैकी 39146 जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामधील 33686 जणांचे अहवाल हे नेगेटिव्ह असले तरी 5460 रुग्णांचे अहवाल मात्र पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झालं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *