कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनचे देशात 38 रुग्ण, आरोग्य मंत्रालयाची माहिती

ताज्या घडामोडी देशविदेश

नवी दिल्ली : कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना कोरोनाच्या नव्या स्ट्रेनच्या रुग्णांमध्ये हळूहळू वाढ होताना दिसत आहे. देशात कोरोनाच्या नव्या स्ट्रेनच्या रुग्णांची संख्या आता 38 वर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज दुपारी याबाबत माहिती दिली. कोरोना व्हायरसचा नवीन स्ट्रेन प्रथम ब्रिटनमध्ये दाखल झाला होता, जो 70 टक्के जास्त संसर्गजन्य आहे.

शनिवारी इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) सांगितले की, ब्रिटनमध्ये समोर आलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनला भारताने यशस्वीरित्या ‘कल्चर’ केलं आहे. ‘कल्चर’ ही अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे पेशींना नियंत्रित स्थितीत निर्माण केले जाते, सामान्यत: नैसर्गिक वातावरणाच्या बाहेर असं केलं जातं.ब्रिटनमध्ये नवीन स्ट्रेनचे यशस्वीरित्या वेगळं आणि कल्चर करण्यात आलं आहे. यासाठी ब्रिटनहून परत आलेल्या लोकांचे नमुने गोळा करण्यात आले आहेत.

राज्यात कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा एकही रुग्ण नाही

महाराष्ट्रात कोरोनाचं हे नवं संकच राज्यात धडकण्यापूर्वीच आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आणि त्याच धर्तीवर नियमांचं अधिक काटेकोरपणे पालन केलं गेलं. देशात युकेहून परतलेल्या आणि प्रवासाचा संदर्भ असलेल्या काही प्रवाशांना कोरोनाच्या नव्या विषाणूचा संसर्ग झाल्याचं वृत्त हाती आलं आणि तणावाच्या परिस्थितीत आणखी वाढ झाली. मुंबई, नवी मुंबई, ठाणे- कल्याण, पुणे अशा ठिकाणी युकेहून आलेल्या प्रवाशांची संख्याही हजारांच्या घरात पोहोचली. मात्र कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा एकही रुग्ण राज्यात नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

कोरोनाची देशातील सद्यस्थिती

भारतात रोज नोंदल्या जाणाऱ्या नव्या कोविडबाधितांच्या संख्येतील घसरण कायम राहिली आहे. गेल्या 24 तासांत,देशपातळीवरील कोविड बाधितांच्या संख्येत 16,504 नव्या बाधितांची वाढ झाली. प्रतिदिन नोंद होणाऱ्या नव्या रुग्णांच्या संख्येत घसरण झाल्यामुळे, देशातील सक्रीय कोविड ग्रस्तांच्या संख्येत सातत्याने घसरण होत आहे. आतापर्यंतच्या एकूण कोविड ग्रस्तांची संख्या लक्षात घेता आता देशात फक्त 2.36 टक्के सक्रीय रुग्ण आहेत. गेल्या 24 तासांत एकूण कोविड ग्रस्तांची संख्या 3,267 ने कमी झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *