नवी दिल्ली : कोरोना व्हायरसची वाढती संख्या आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूची प्रकरणं दररोज आपण ऐकत आहोत. मात्र ही बातमी वाचण्यापूर्वी वरचा फोटो पाहा. हा शेवटचा फोटो आहे डॉक्टर आयशाचा. अत्यंत अॅक्टिव्ह अशी आयशा आताच डॉक्टर झाली होती. त्यामुळे अर्थातच ती खूप खुश होती.
मात्र त्यातच तिला कोरोनाची लागण झाली. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिच्यावर उपचार सुरू होते, मात्र ती कोरोनाला हरवू शकली नाही. आणि ईदीच्या दिवशी तिने शेवटचा श्वास घेतला. जगाचा निरोप घेताना ती लोकांसाठी एक संदेश आणि हास्य सोडून गेली.
17 जुलै रोजी आयशाचा वाढदिवस आहे. तिने आपला 17 वा वाढदिवस खूप आनंदात साजरा केला. त्याचा एक व्हिडीओ तिने आपला ट्विटर अकाऊंटवर पोस्ट काढला. या व्हिडीओत ती खूप आनंदात दिसत होती. व्हिडीओमध्ये ती वाढदिवस साजरा करीत असल्याचे दिसत आहे. तिच्या त्या फोटोमध्ये ती अत्यंत आनंदात दिसत आहे. ट्विटरवर तिने एक संदेशही लिहिला आहे. त्यात ती म्हणते—हाय फेंड्स…मी कोरोनाशी नाही लढू शकत..आज कोणत्याही क्षणी मी व्हेंटिलेटरवर जाऊ शकते..मला आठवणीत ठेवा…तुमच्यासाठी माझी स्माइल…तुमच्या मैत्रीसाठी खूप आभार…तुमची खूप आठवण येईल..सुरक्षित राहा…या जीवघेण्या व्हायरसला गांभीर्याने घ्या…सर्वांना प्रेम..बाय