शिवसेनेचा राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा दणका, रेडी रेकनर पुणे जिल्हा दरात सर्वाधिक वाढ

ताज्या घडामोडी पुणे

पुणे : राज्यात शुक्रवारपासून रेडी रेकनरचे नवे दर लागू करण्यात आले आहेत. नोंदणी महानिरीक्षक यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात मुंबई हे केवळ एकमेव शहर असेल जिथे रेडी रेकनर घटवण्यात आला आहे तर पनवेल महापालिका क्षेत्र हे राज्यात सर्वाधिक वाढ असलेले क्षेत्र आहे. कोणाच्या काळात राज्यात गेल्या पाच महिन्यात नोंदणीशुल्क मध्ये तब्बल 60 टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. जिल्ह्याचा विचार करता पुणे जिल्हा हा राज्यात सर्वाधिक वाढ करण्यात आलेला जिल्हा आहे. यामुळे आता एक वेगळंच राजकारण पेटलेलं दिसतं.

महाआघाडी ठाकरे सरकारने राज्यात आपल्यासोबत सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा दणका दिला आहे. रेडी रेकनरचे दर ठरवताना शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात म्हणजे मुंबईत रेडी रेकनर दरामध्ये 0.6 टक्क्यांनी घट करण्यात आली तर राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पुणे जिल्ह्यात राज्यात सर्वाधिक म्हणजे तब्बल 3.91 टक्के वाढ केली गेली. त्यामुळे यावर सध्या तीन पक्षांकडून राज्याचा विचार करण्यापेक्षा आप-आपले गड कसे शाबूत राहतील व त्यासाठी सरकारमध्ये राहून काय लाभ उठवता येतील याचाच प्रयत्न सुरू असल्याचं समोर येत आहे.

गेल्या वर्षी झालेल्या दस्तांची नोंदणी मिळालेला महसूल या आकडेवारीवरून ठरलेल्या प्रमाणानुसार ही वाढ अथवा घट करण्यात आल्याचे नोंदणी महानिरीक्षक यांनी सांगितले.

कसे करण्यात आले रेडी रेकनरमध्ये बदल?

राज्यात सरासरी 1.78 टक्के वाढ

राज्याच्या ग्रामीण भागात सरासरी 2.81 टक्के वाढ

प्रभावक्षेत्रात 1.89 टक्के

नगरपालिका आणि नगर पंचायत क्षेत्रामध्ये 1.29%

मनपा क्षेत्रात1.02% वाढ

शहरानुसार झालेली वाढ

पुणे महापालिका क्षेत्रात 2% वाढ

पीसीएमसी 3.3% वाढ

मुंबईत 0.6% ने घट

ठाण्यात 0.2% ने वाढ

राज्यात सर्वाधिक वाढ पुण्यात

पुणे जिल्ह्यात 3.91% वाढ

नोंदणी शुल्काच्या महसूलात कोरोनाच्या काळात 60 टक्के घट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *