पंढरपूर शहर पोलिसांनी घरफोडी चोरांची टोळी केली जेरबंद

क्राईम पंढरपूर

घरफोडीचे सहा गुन्हे उघड तर एका जबरी चोरीतील आरोपींना अटक
एक लाख ३६ हजाराचा मुद्देमाल हस्तगत

पंढरपूर (प्रतिनिधी):- पंढरपूर शहरातील विविध ठिकाणी घडलेल्या एकूण पाच घरफोडी व एका जबरी चोरीतील गुन्ह्याची उकल करण्यात पंढरपूर शहर पोलीस स्टेशन व गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश आले असून त्यांनी चोरीस गेलेले सोन्याचे दागिने सह इतर मुद्देमाल हस्तगत केला आहे. विविध गुन्ह्यातील एकूण पाच आरोपींना अटक केली असून एक लाख ३६ हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याचबरोबर गुन्ह्याच्या दरम्यान वापरलेली हत्यारे ही पोलिसांनी हस्तगत केली आहेत.याबाबत अधिक माहिती अशी पंढरपूर शहर पोलीस ठाणे कडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व शहर पोलीस निरीक्षक यांच्या बातमीदारा मार्फत शहरात रात्रीच्या वेळेस फिरवून घरफोड्या करणारे सागर कृष्णात हराळे (वय २९) रा. झाखले ता. पन्हाळा जिल्हा कोल्हापूर हल्ली राहणार नामानंद महाराज मठ पंढरपूर लखन कालिदास काळे (वय २१) रा.अर्बन बँकेजवळ जुने कोर्टाचे मागे व त्यांचे दोन साथीदार यांच्यासह शहरात चोरी करत असल्याची माहिती मिळाली सदर माहितीची खातरजमा करण्यासाठी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे साहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ गायकवाड यांनी आरोपी  सागर हराळे व लखन काळे यांना ताब्यात घेऊन सखोल व कौशल्यपूर्ण चौकशी केली असता त्यांनी व त्यांच्या साथीदारांसह पंढरपूर शहरात घरफोडी करून चोरी केली असल्याचे निष्पन्न झाले. या चौकशी दरम्यान पंढरपूर तालुका पोलीस ठाणे कडील हद्दीत केलेल्या गुन्ह्याची कबुली आरोपींनी दिली असून एकूण पाच घरफोडी केल्याची  कबुली या आरोपींनी दिली यांच्याकडून या पाच  विविध ठिकाणी केलेल्या घरफोडीतील ३३०० रुपये चिल्लर दोन हजार सहाशे रुपये दोन ऍडजेस्टमेंट पाना एक लोखंडी टिकाऊ व एक मोठा ड्रायव्हर पंधरा हजार रुपये किमतीचे कानातील सोन्याचे दोन कर्णफुले कसे २० हजार ९०० रुपये किमतीचे साहित्य व सोन्याचे कर्णफुले जप्त करण्यात आली या आरोपींचा एक साथीदार फरार असून लवकरच अटक करून शहर व परिसरातील आणखीन गुन्हे उघडकीस आणण्याचा प्रयत्न पोलिसाचे पथक करत आहे. दरम्यान शहरातील लोणार गल्ली येथील संदेश लक्ष्मण नवत्रे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचे घरातील लाकडी कपाटामध्ये ठेवलेले ९० हजार रुपये किमतीचे सोन्याचे तीन तोळ्याचे गंठण चोरीस गेल्याची फिर्याद दिली होती या प्रकरणी सौरभ उर्फ अक्षय कुमार नवत्रे (वय २५) त्याचे संशयित हालचालीवरून ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता कौशल्यपूर्ण चौकशीत त्याने गुन्हा केल्याचे कबूल करून चोरीस गेलेला मुद्देमाल त्याच्याकडून हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याचप्रमाणे तिरंगा नगर लिंक रोड येथील सौ रंजना संभाजी जाधव हे आपले घराकडे जात असताना तिरंगा नगरीतील बाबर यांचे घराजवळ आले असताना समोरून येणाऱ्या मोटरसायकलवरून दोन अज्ञात इसमांनी जबरदस्तीने त्यांचे गळ्यातील ५० हजार रुपये किमतीचे एक २५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण हिसका मारून तोडून चोरून नेले होते या घटनेतील आरोपी अकलूज पोलीस ठाणे पोलीसांनी पकडले होते. शंकर उर्फ पप्पू सूळ (वय २५) रा. गोंदी तालुका इंदापूर जिल्हा पुणे, बबलू कांतीलाल चोरमले(वय २०) वर्ष रा. गोंदी तालुका इंदापूर जिल्हा पुणे यांना पकडले त्यांना पंढरपूर कडे वर्ग करून त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता सदर गुन्ह्या केल्याचे सांगून गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल यापैकी अर्धवट तुटलेल्या सोन्याचे गंठण २६ हजार रुपये किमतीचे हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. वरील पाच घरफोड्या व एक जबरी चोरी असे सहा घरफोड्यांची उकल करणे कामी पोलीस अधीक्षक मनोज पाटील अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे उपविभागीय पोलिस अधिकारी डाॅ.सागर कवडे यांचे मार्गदर्शनाखाली शहर पोलीस निरीक्षक अरुण पवार गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नवनाथ गायकवाड पोलीस हेडकॉन्स्टेबल सुजित उबाळे, बिपिन चंद्र, सुरज हेंबाडे, गणेश पवार, सतीश चंदनशिवे ,मच्छिंद्र राजगे ,इरफान शेख, अभिजीत कांबळे,शोएब  पठाण,  प्रसाद औटी,  संदीप पाटील,सुजित जाधव, सिद्धनाथ मोरे, संजय गुटाळ, समाधान माने या पथकाने मोलाची कामगिरी केली असून सदर गुन्ह्यांचा पुढील तपास सपोनि नवनाथ गायकवाड हवालदार सुजित उबाळे व सूरज हेंबाडे हे करीत आहेत. पोलिसांनी केलेल्या अतुलनीय कामगिरीमुळे नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *