गरीब लोगों को साडी,पैसे दे रहे है असे म्हणून ४६ हजारांची फसवणूक

0
63
सोलापूर : गरीब लोगों को साडी और पैसे दे रहे है असे म्हणून एका वृद्ध महिलेची ४६ हजार ८०० रुपयांची फसवणूक केल्याची घटना दि.१० ऑगस्ट रोजी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास मंगळवार पेठ सोलापूर येथे घडली.याप्रकरणी मुमताज निजाम मंगरूळकर (वय-६०,नवीन विडी घरकुल,सोलापूर) यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.याप्रकरणी दोघा अज्ञात इसमानविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
   याबाबत अधिक माहिती अशी की,फिर्यादी व फिर्यादीची बहीण यांना दोघा इसमांनी हिंदीमध्ये सामनेवाले बिल्डिंग मे बहुत दिन के बाद बेटा पैदा हुआ है,इसलिये ओ लोग गरीब लोगों को पैसे और साडीया दे रहे है असे म्हणाले.त्यानंतर फिर्यादी यांना त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने काढून त्यांच्या पाकीट मध्ये ठेवण्यास सांगितले.त्यावेळी त्या दोघा इसमांनी फिर्यादीची नजर चुकवून व हातचलाखीने दागिने काढून घेऊन त्यांची ४६ हजार ८०० रुपयांचे दागिने घेऊन फसवणूक करून घेऊन गेले आहे.असे फिर्यादीत म्हटले आहे.या घटनेची नोंद जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात झाली असून,या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार शेख हे करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here