ज्वेलर्स दुकान फोडून सहा लाखांचा ऐवज लंपास

0
88

सोलापूर (प्रतिनिधी) न्यू आर बी नंदाल या नावाचे ज्वेलर्स दुकान फोडून अज्ञात चोरट्याने सहा लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना दि.१७ ते १८ ऑगस्ट दरम्यान साखर पेठ सोलापूर येथे घडली. याप्रकरणी रेनॉन बालाजी नंदाल (वय-३८,रा. जोडभावी पेठ,कन्या चौक,सोलापूर) यांनी जेलरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

     याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी यांचे न्यू आर बी नंदाल नावाचे ज्वेलर्स दुकान आहे. त्यांच्या दुकानात कोणीतरी अज्ञात चोरट्याने फोल्डिंग लाकडी दरवाजाला बाहेरून लावलेले कुलूप,कडी कापून दुकानात प्रवेश केला. त्यानंतर दुकानातील चार लाख ३४ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने, एक लाख ४० हजार रुपये किमतीचे चार तोळे सात ग्रॅम वजनाचे सोन्याचे तयार दागिने व ३५ हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने असा मिळून एकूण सहा लाख नऊ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.या घटनेची नोंद जेलरोड पोलिस ठाण्यात झाली असून,या घटनेचा पुढील तपास पोनि राऊत हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here