चित्रपटगृह बंद! आता ‘ओटीटी’वर एकाच दिवशी 4 चित्रपटांची टक्कर

मनोरंजन

चित्रपटगृह बंद! आता ‘ओटीटी’वर एकाच दिवशी 4 चित्रपटांची टक्कर
बई : करोना व्हायरसमुळे देशात उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चित्रपटगृहे पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे चित्रपटसृष्टीने चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मचा मार्ग निवडला आहे. पण आता एकाच दिवशी चार चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे समोर आले आहे.
येत्या 31 जुलै रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर चार चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. या चित्रपटांमध्ये विद्या बालनचा ‘शकुंतला देवी’, कुणाल खेमूचा ‘लूटकेस’, नवाजुद्दीन सिद्दिकीचा ‘रात अकेली है’ आणि विद्युत जामवालाचा ‘यारा’ या चित्रपटांचा समावेश आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांना चित्रपटांची मेजवानी मिळणार आहे.
तसेच चारही चित्रपट वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. विद्या बालनचा ‘शकुंतला देवी’ हा चित्रपट अ‍ॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे. विद्या बालनचा हा चित्रपट प्रसिद्ध गणितज्ञ शकुंतला देवी यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात विद्या बालनसोबत सान्या मल्होत्रा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सान्या शकुंतला देवी यांच्या मुलीची भूमिका साकारणार आहे. त्याचबरोबर अमित साध आणि जिस्शु सेनगुप्ता देखील महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनु मेनन यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *