‘खुर्चीसाठी हिंदुत्त्वाला आपल्या सोयीनुसार चालवणाऱ्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये’

ताज्या घडामोडी महाराष्ट्र

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातल्या भाषणात भाजपवर जोरदार निशाणा साधला होता. आता भाजपनं मुख्यमंत्र्यांवर पलटवार केला आहे. खुर्चीसाठी हिंदुत्त्वाला आपल्या सोयीनुसार चालवणाऱ्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दसरा मेळाव्यात आपली अर्वाच्य भाषा, एका अभ्यासशून्य व सूडाने प्रेरित भाषणातून सादर केली. खुर्चीसाठी हिंदुत्त्वाला आपल्या सोयीनुसार चालवणाऱ्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. राज्यप्रमुख असूनही आपल्या भाषणात एकही सेकंद शेतकऱ्यांसाठी दिला नाही, मग त्या पदाचा काय उपयोग? असा टोला देखाल चंद्रकांत पाटील यांनी टोला लगावला आहे.

चंद्रकांत पाटील यांनी ‘सोयीचे हिंदुत्व’ अशी फेसबुक पोस्ट लिहून उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले, शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात देशाच्या सर्वोच्च पदी असणाऱ्या लोकांबद्दल अगदी अर्वाच्य भाषेचा उपयोग केला. तुम्ही राज्यप्रमुख आहात, याचा कदाचित तुम्हाला विसर पडला असल्याची प्रचिती आली. कालच्या भाषणात पुन्हा एकदा तुमच्या तथाकथित हिंदुत्त्वाच्या नावानं गाजावाजा केला. मात्र, सत्तेच्या लालसेपोटी सोयीनुसार तुम्ही हिंदुत्त्वाची व्याख्या बदलत आहात, हे प्रकर्षाने जाणवलं, बाळासाहेबांच्या नावानं अजुन किती दिवस पोळ्या भाजणार? असा सवाल करत खुर्चीसाठी त्यांनी दिलेल्या हिंदुत्वाच्या शिकवणीचे पालण करणं तुम्ही विसरला आहात, अशी टीका केली. आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *