ड्रग्ज तस्करी प्रकरणी प्रसिद्ध साऊथ अभिनेत्रीच्या घरात CCB ची छापेमारी

ताज्या घडामोडी महाराष्ट्र

बंगळुरू : सुशांत सिंह रजपूत मृत्यू प्रकरणी ड्रग्जचं कनेक्शन समोर आल्यानंतर आता नार्कोटिक्स विभागाकडून बॉलिवूड आणि सिनेमा इंडस्ट्रीतील अभिनेते आणि अभिनेत्रींची चौकशी होत असल्याचं समोर आलं आहे. ड्रग्जच्या रॅकेटमध्ये ज्या लोकांचा सहभाग आहे त्या सगळ्यांची चौकशी केली जात असल्याचं समोर आलं आहे.

कन्नडची प्रसिद्ध अभिनेत्री रागिणी द्विवेदीच्या घरी CCB पोलिसांनी छापेमारी केली. न्यायालयाकडून सर्च वॉरंट घेऊन CCB पोलीस रागिणीच्या घरी पोहोचले. रागिणीचं ड्रग्ज तस्करीत कनेक्शन असल्याची माहिती मिळाल्यानंतर तिच्या घरी शुक्रवारी छापेमारी करण्यात आली.

रागिणीचा मित्र रवीशंकरला CCB पोलिसांनी ड्रग्ज तस्करीच्या आरोपात अटक केली असून रागिणीचीही या प्रकरणी चौकशी सुरू आहे. ड्रग्ज रॅकॅटमध्ये रागिणीचाही हात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. दुसरीकडे मुंबईत सुशांत सिंह रजपूत मृत्यू प्रकरणी ड्रग्ज कनेक्शन असल्याचं समोर आलं. रिया आणि शोविकचं एक्स्लझिव्ह ड्रग्ज संदर्भातील चॅट समोर आल्यानंतर वेगानं पावलं उचलत शुक्रवारी सकाळी नार्कोटिक्स विभागाची टीम रियाच्या घरी पोहोचली.

दुसरी टीम सॅम्युल मिरांडाच्या घरी पोहोचली. त्यांनी सॅम्युलला चौकशीसाठी ताब्यात घेतलं असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी रिया आणि शोविकलाही ड्रग्ज प्रकरणात केवळ चौकशी होणार की अटक होणार? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *