मुंबई पोलिसांना चपराक, सुशांत सिंह आत्महत्येप्रकरणी CBI कडून गुन्हा दाखल

क्राईम मुंबई

मुंबई: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput Death) कथित आत्महत्येप्रकरणी अखेर केंद्रीय अन्वेषण विभागानं (CBI) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिहार सरकारच्या विनंतीवरुन CBIने सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दिल्ली येथे हा गुन्हा दाखल करण्यात आला असून लवकर CBIच्या मुंबई विभागाला हे प्रकरण वर्ग करण्यात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दिल्ली CBIनं एकूण 7 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रिया चक्रवर्ती, तिचे वडील-आई, भाऊ शोविक चक्रवर्ती, मित्र सॅन्मुयल मिरांडा, श्रुती मोदीसह एका अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हेगारी कट रचणे, आत्महत्येस जबाबदार असणे, अडवणूक करणे, चोरी, विश्वासघात करणे, फसवणूक करणे, कट रचणे या अंतर्गत , कलम 120 B,306,341,342,380,406,420,506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बिहारमधील पाटणाच्या राजीव नगर पोलीस ठाण्यात दाखल असलेला गुन्हा आता CBIकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे आता मुंबई पोलिसांना ही सणसणीत चपराक असून त्यांच्या हातातून सुशांत सिंह राजपूत प्रकरण जवळपास गेल्याचे निश्चित झालं आहे. तर शनिवारी सुप्रीम कोर्टात या प्रकरणी सुनावणी असून मुंबई पोलिस सुशांत सिंह प्रकरणाचा तपास अहवाल कोर्टात सादर करणार आहेत. मात्र, आता मुंबई पोलिस या प्रकरणी काय करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

ईडीकडून होणार रियाची चौकशी…

सुशांत सिंह राजपूतच्या कथित मृत्यूला घटनेला जवळपास 2 महिने पूर्ण होत आले आहेत. याप्रकरणाचा तपास सध्या वेगळ्या वळणावर येऊन पोहोचला आहे. याप्रकरणी सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला (Rhea Chakraborty) अंमलबजावणी संचलनालयाने (Enforcement Department ED) समन्स बजावून 7 ऑगस्ट रोजी चौकशीकरता हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

ईडीच्या मुंबई कार्यालयामध्ये ही चौकशी होणार आहे. दरम्यान आज रियाचा सीए रितेश शाहची देखील ईडीकडून चौकशी केली जाणार आहे. दरम्यान याआधीही रितेशला समन्स बजावण्यात आले होते, मात्र तो चौकशीला सामोरे गेला नव्हता. याआधी रियाचा जवळचा मित्र ज्याचे बिहार पोलिसांच्या एफआयआरमध्ये नाव आहे, त्या सॅम्युअल मिरांडाची देखील ईडीने चौकशी केली होती.

सुशांत सिंह राजपूतचा सीए संदीप श्रीधरची (Sandeep Shridhar) देखील ईडीने चौकशी केली आहे. श्रीधरच्या चौकशीनंतर रियाला देखील समन्स बजावण्यात आले आहेत. सुशांतचे आर्थिक व्यवहार आणि त्याने संस्थापित केलेल्या कंपन्यांसंदर्भात श्रीधरची चौकशी करण्यात आली होती.

रियाच्या दोन मालमत्तांविषयी ED ने प्रश्न उपस्थित केले आहेत. 7 ऑगस्टला रियाला मुंबईत ED च्या कार्यालयात हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सुशांत सिंह राजपूत आणि रिया चक्रवर्ती यांनी एकत्रितपणे काही कंपन्या आणि मालमत्ता विकत घेतल्या होत्या. यामध्ये रियापेक्षा सुशांतचेच पैसे अधिक होते, असे आरोप आहेत. ED ने नेमक्या कुठल्या मालमत्तांविषयी प्रश्न उपस्थित केले आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण रिया चक्रवर्तीच्या संपत्तीचा आणि मालमत्तेच्या स्पष्ट हिशोब नाही, हे यावरून उघड झालं आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *