सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी रिया चक्रवर्तीला 24 तासांत CBI पाठवू शकते नोटीस

ताज्या घडामोडी देशविदेश मुंबई

मुंबई : सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी सीबीआयने आपला तपास सुरु केला आहे. गेल्या दोन दिवसांपासून सीबीआय मुंबईत या प्रकरणाचा कसून तपास करत आहे. आता सीबीआय अभिनेत्री आणि सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता असून तिला नोटीस पाठवण्यात येणार असल्याचंही बोलंलं जात आहे. काल (रविवारी) सीबीआयने सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानीची चौकशी केली. यावेळी सिद्धार्थला रिया चक्रवर्तीबाबात प्रश्न विचारण्यात आला. सीबीआयने चौकशी दरम्यान, सिद्धार्थलसा विचारलं की, रिया घर सोडून का गेली? तसेच सीबीआयने काल पुन्हा सुशांतच्या घरी तब्बल साडे तीन तास तपास केला.

काल डीआरडीओ गेस्ट हाऊसमध्ये सीबीआयकडून सिद्धार्थ पिठानी, सुशांतचा स्वयंपाकी नीरज सिंह आणि दीपेश सावंत यांची चौकशी करण्यात आली. सीबीआयने याआधीही या तिघांची चौकशी केली आहे. परंतु, रविवारी या तिघांचीही पुन्हा चौकशी करण्यात आली. पहिल्यांदा सिद्धार्थ आणि नीरज यांना समोरा-समोर बसवून चौकशी करण्यात आली. त्यानंतर नीरज आणि दीपेश यांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर पुन्हा सिद्धार्थ आणि दीपेश यांची चौकशी करण्यात आली.

रविवारी पुन्हा सुशांतच्या घरी पोहोचली सीबीआयची टीम

सीबीआयची टीम रविवारी पुन्हा सुशांत सिंह राजपूतच्या घरी तपासासाठी गेली होती. यामागील हेतू हाच होता की, सिद्धार्थ, नीरज आणि दीपेश यांनी सुशांतच्या मृत्यूसंदर्भात जी माहिती दिली. त्यामध्ये कोणताही विरोधाभास तर नाही. किंवा हे तिघं कोणतीही गोष्ट लपवत तर नाहीत. त्यानंतर जवळपाप दुपारच्या वेळी अडीच वाजता सीबीआयची टीम एफएसएलच्या एक्सफर्ट्स आणि सिद्धार्थ, नीरज आणि दीपेश यांच्यासोबत सुशांतच्या घरी तपासासाठी पोहोचली.

यामागील हेतू शनिवारी सुशांतच्या घरी करण्यात आलेली चौकशीचं विश्लेषण करण्याचा होता. रविवारी सीबीआयने सुशांतच्या बिल्डिंगच्या समोरील भागातील व्हिडीओग्राफी करण्यात आली. तर शनिवारी बिल्डिंगच्या मागील भागातील व्हिडीओग्राफी करण्यात आली होती. याव्यतिरिक्त सीबीआयची टीम सुशांतच्या रूममध्ये म्हणजेच, जिथे सुशांतचा मृतदेह सापडला होता तिथेही सीबीआयच्या पथकाने पाहणी केली. पुन्हा एकदा त्या खोलीचं मॅपिंग करण्यात आलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *