CBI : सुशांतसिंह प्रकरण तपासासाठी सीबीआयचे पथक मुंबईत दाखल

क्राईम मुंबई

मुंबई : सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर सुशांतसिंह प्रकरण तपासासाठी सीबीआय पथक मुंबईत दाखल झाले आहे. कालच सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा आदेश दिला.

सुवेझ हक हे सीबीआयचे नोडल ऑफिसर म्हणून कार्यरत आहे. सीबीआयचं 10 सदस्यीय पथक मुंबईत दाखल झाले आहे.  पाच टीम बनवून एसआयटी उद्यापासून मुंबईत या प्रकरणाची चौकशी सुरू करणार आहे. सीबीआयनं आधीच स्थापन केलेली स्पेशल इन्विस्टिगेशन टीम या प्रकरणाचा पुढचा तपास करणार आहे. यात सीबीआयचे जॉईंट डायरेक्टर मनोज शशीधर, आयपीएस गगनदीप गंभीर, एसपी नुपूर प्रसाद आणि अॅडशिनल एसपी अनिल यादव यांचा समावेश आहे.

या प्रकरणातली केस डायरी, क्राईम सीनवरचे फोटो, ऑटोप्सी रिपोर्ट आणि आत्तापर्यंत घेतलेल्या जबानींची प्रत या सगळ्या गोष्टी मुंबई पोलिसांना या टीमला सादर कराव्या लागणार आहेत. सीबीआयचा तपास हा बिहार पोलिसांच्या एफआयआरवर आधारित असणार आहे.

मागच्या वेळी तपासासाठी आलेले बिहार पोलिस टीमचे अधिकारी विनय तिवारी यांना बीएमसीनं क्वारंन्टाईन केलं होतं. आता मात्र सीबीआयची ही टीम सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर दाखल होतेय, शिवाय तपासात महाराष्ट्र सरकारनं पूर्ण सहकार्य करावं असंही कोर्टानं आपल्या आदेशात म्हटलं आहे. त्यामुळे आता या टीमला महाराष्ट्रात कशा पद्धतीनं वागणूक दिली जाते हे देखील पाहणं महत्वाचं असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *