पालखी सोहळ्याबाबत समन्वय साधण्याचा प्रयत्न ;अजित पवार

बारामती/ यंदा आषाढीवारी पालखी सोहळ्याची परंपरा टिकवत असताना सध्या करोनाच्या प्रादुर्भावाचा विचारही होणे गरजेचे आहे. कुंभमेळा व इतर बाबतीत घडले आहे. तसे पालखी सोहळ्यात घडू नये. तसेच ही परंपरा टिकली पाहिजे. असा समन्वय साधण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून केला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती येथे दिली.पवार म्हणाले की, दहा मानाच्या पालख्यांसह दुप्पट वारकऱ्यांना […]

Continue Reading

पुणे लोहमार्ग पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकासह 8 पोलिस तडकाफडकी निलंबीत

पुणे – पुणे स्टेशन येथील लोहमार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेशसिंह गाैड यांच्यासह आठ जणांना अपर पोलिस महासंचालक (लोहमार्ग) प्रज्ञा सरवदे यांनी तडकाफडकी निबंलीत केले आहे. अमली पदार्थ प्रकरणी केलेल्या कारवाईनंतर तपासात अनियमितता केल्याचा ठपका ठेवत त्यांना निलंबीत करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. याबाबतचे आदेश त्यांनी दोन दिवसापुर्वी दिले आहे. एकाचवेळी वरिष्ठ निरीक्षकासह […]

Continue Reading

लेकरांना सकाळी जाग आली अन् आई-वडील आढळले मृतावस्थेत

पुणे: लग्नाला तेरा वर्षे होईपर्यंत संसाराचा गाडा सुरळीत चालू होता. पण मनात संशयाची पाल चुकचुकल्याने एका क्षणात तेरा वर्षाचा संसार उद्धवस्त झाला आहे. मंगळवारी रात्री घरातील सर्वजण जेवण करून शांत झोपले होते. त्यावेळी पतीने चारित्र्याच्या संशयातून आपल्या पत्नीची ओढणीने गळा आवळून हत्या केली. त्यानंतर पतीनेही गळफास घेऊन स्वतःला संपवलं आहे. पण या घटनेबाबत नामानिराळी असलेली […]

Continue Reading

कोरोनाबाधित पतीची रात्री तब्येत खालावली, डॉक्टर पत्नीने AC च्या हवेतून दिला ऑक्सिजन

पुणे : पुण्यात कोरोनाने थैमान घातले आहे. हॉस्पिटलमध्ये (covid hospital) बेड मिळणे कठीण झाले आहे. घरीच होमक्वारंटाइन असलेल्या पतीची ऑक्सिजन पातळी (oxygen level) कमी झाली त्यामुळे डॉक्टर असलेल्या पत्नीने एसीच्या हवेच्या दाबाने ऑक्सिजन देऊन ऑक्सिजन लेव्हल कायम ठेऊन बरं करण्याचा कौतुकास्पद प्रयोग यशस्वी केला आहे. एसीचा (AC) ऑक्सिजन concentrator सारखा वापर करून सागर राव यांचा […]

Continue Reading

भाजप नगरसेविकेच्या मुलाचा गोळी लागल्यामुळे मृत्यू, पुण्यातील खळबळजनक घटना

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड  शहरातील भाजपच्या नगरसेविका करुणा चिंचवडे यांचा मुलगा प्रसन्ना चिंचवडे याचा गोळी लागल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान, प्रसन्नाने स्वतः गोळी झाडून आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस उपायुक्त मंचक इप्पर यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री 9 च्या सुमारास […]

Continue Reading

26 वर्षीय गर्लफ्रेंडच्या मदतीने काढला आईचा काटा, पुण्यात 19 वर्षीय मुलाने गाठला क्रूरतेचा कळस

पुणे : जगात कोणतं नातं जे सर्वश्रेष्ठ मानलं जातं ते म्हणजे आई-मुलाचं नातं. पण याच नात्याला काळीमा फासणारी घटना पुण्यामध्ये घडली आहे. एका 19 वर्षीय मुलाने त्याच्याच आईची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये त्याच्या 26 वर्षीय गर्लफ्रेंडने देखील त्याची साथ दिल्याची माहिती समोर येते आहे. पोलिसांनी त्या तरुणास अटक केली असून, त्याच्या गर्लफ्रेंडवर […]

Continue Reading

पश्चिम महाराष्ट्रातील वीजग्राहकांकडून 580 कोटींच्या थकबाकीचा भरणा

महावितरणची आर्थिक कोंडी फोडण्यासाठी वीजबिल भरण्यास वेग पुणे, : गंभीर स्वरुप धारण केलेले आर्थिक संकट दूर करण्यासाठी थकीत वीजबिलांचा भरणा करून सहकार्य करा या महावितरणच्या आवाहनाला प्रतिसाद देत पश्चिम महाराष्ट्रातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक 4 लाख 54 हजार थकबाकीदार वीजग्राहकांनी गेल्या 23 दिवसांमध्ये 579 कोटी 88 लाख रुपयांचा भरणा केला आहे. गेल्या 1 एप्रिल 2020 पासून […]

Continue Reading

पुण्यात आज रात्रीपासून कोरोनाची कडक नियमावली; पुन्हा नवे निर्बंध

पुणे : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा एकदा मोठ्या संख्येने वाढत आहेत. त्यामुळे राज्यभरातील कोरोनाचे नियम अधिक कडक करण्याची सूचना सरकारकडून देण्यात आली आहे. दरम्यान पुण्यातील रुग्णसंख्या पाहता येथील कोरोनाच्या नियमांबाबत मोठी बातमी समोर आली आहे. आज विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकार परिषद घेत याची माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे विभागातील कोरोना हॉटस्पॉट […]

Continue Reading

महावितरणाचा पश्चिम महाराष्ट्राला ‘शॉक’, बील न भरणारे 14 लाख कनेक्शन तोडणार!

पुणे :  1 एप्रिल 2020 पासून एकदाही वीजबिल (electricity bill) न भरणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वर्गवारीतील 14 लाख 29 हजार 811 ग्राहकांनी थकबाकीचा भरणा न केल्यास नाईलाजास्तव वीजपुरवठा खंडीत करण्याची कारवाई पुढील तीन आठवड्यात करण्याचे निर्देश महावितरणचे (MSEDCL) पुणे प्रादेशिक संचालकांनी दिले आहे.  महावितरणच्या आर्थिक संकटाचा विचार करून वीजग्राहकांनी थकबाकीचा त्वरीत भरणा […]

Continue Reading

‘बायकोने काळी जादू केली, 6 लाखांचे कबतूर घ्या, मुलगा वाचेल’ पुण्यातील धक्कादायक घटना

पुणे : महाराष्ट्राची सांस्कृतिक नगरी असलेल्या पुण्यात (Pune) अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी धक्कादायक घटना घडली आहे. मुलावर कुणी तरी करणी केली असून ती उतरवण्यासाठी तब्बल 6 लाख रुपयांचे कबूतर विकत घेण्यास सांगितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी भोंदूबाबाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे. पुण्यातील कोंढवा परिसरात ही घटना घडली आहे. […]

Continue Reading