वाळवंटातली गाढवं निघाली उटीला! वाळूमाफियांना पोलिसांचा असाही दणका

चंद्रभागेच्या वाळवंटात रोज लाखो रुपये किमतीचा बेकायदा वाळू उपसा होत असतो. या उपशानंतर वाळू वाहतुकीसाठी या गाढवांचा वापर केला जातो. पंढरपूर : पुढे एक पोलीस गाडी, मागे एक पोलीस गाडी आणि मध्ये दोन टेम्पो असा लवाजमा पंढरपूर शहर पोलीस ठाण्यातून बाहेर पडला आणि पाहणाऱ्याला वाटले कि यात खूप काहीतरी मौल्यवान सामान आहे. ज्याच्यासाठी हा पोलीस […]

Continue Reading

पंढरपुरात चोराची भन्नाट शक्कल! नारळाच्या झाडावरुन माडीवर उतरत करायचा चोरी

पंढरपूर : पंढरपूर शहरातील फर्निचरचे व्यापारी अजित फडे यांच्या बंगल्यातून अज्ञात चोरट्यांनी सुमारे 15 लाख 70 हजार रुपयांचा ऐवज पळवून नेला होता. या प्रकरणी पोलिसांनी शिताफीने तपास करुन आरोपीच्या मुसक्या आवळल्या असून 11 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली. घटनास्थळी घराचे कुलूप अथवा घराची कडी तुटली नसल्याने […]

Continue Reading

विठ्ठल मंदिरही भाविकांसाठी खुलं; रोज १ हजार भाविकांना घेता येणार दर्शन

ऑनलाइन बुकिंग करणाऱ्या भाविकांनाच दर्शन पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुख दर्शन पहाटे ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत घेता येणार आहे. दररोज एक हजार भाविकांना दर्शन दिलं जाणार असून फक्त ऑनलाइन बुकिंग करणाऱ्या भाविकांनाच दर्शन घेता येणार आहे. तसेच शासनाने तोंडावर मुखपट्टी, योग्य अंतर, सॅनिटायझरचा वापर आदी नियम बंधनकारक असल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी […]

Continue Reading

कार्तिकी यात्रेला संचारबंदी नको अन्यथा येणाऱ्या सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकणार : वारकरी संप्रदाय

पंढरपूर : कोरोना संकटामुळे मार्चपासून कुलुपात बंद असलेल्या विठुरायाच्या मंदिराची दारे कार्तिकी यात्रेला उघडून कमीतकमी निर्बंध घालून यात्रा होऊ द्यावी, अशी मागणी वारकरी संप्रदायाच्या बैठकीत करण्यात आली. आषाढीप्रमाणे कार्तिकी यात्रेला संचारबंदी लागू न करता मर्यादित वारकऱ्यांना कोरोनाचे नियम पाळून यात्रेला येऊ द्यावे, प्रत्येक मठात 50 भाविकांना उतरण्यास परवानगी द्यावी. कार्तिकी एकादशीला सकाळी बारा वाजेपर्यंत वारकऱ्यांना […]

Continue Reading

आरक्षणासाठी मराठा समाजाचा एल्गार, मुंबईत ‘मातोश्री’वर मशाल मोर्चा, पंढरपुरातून आक्रोश मोर्चा!

मुंबई : आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी मराठा समाजाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मराठा क्रांती मोर्चा प्रतिकात्मक मशाली घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान म्हणजेच मातोश्रीवर धडकणार आहे. संध्याकाळी पाच वाजता वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयापासून या मोर्चाला सुरुवात होणार आहे. तर दुसरीकडे पंढरपुरात मराठा ठोक मोर्चाच्या वतीने आक्रोश मोर्चाल सुरुवात होणार आहे. या मोर्चाला प्रशासनाकडून परवानगी मिळालेली नाही. […]

Continue Reading

मराठा आक्रोश मोर्चाच्या पार्श्‍वभूमीवर विठ्ठल मंदिर परिसरात संचारबंदी, एसटी बंद

पंढरपूर : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) येत्या 7 नोव्हेंबर रोजी पंढरपूरहून मुंबई येथे पायी दिंडी-आक्रोश मोर्चा निघणार आहे. पायी दिंडी ही येथील नामदेव पायरीचे दर्शन करून मुंबईकडे रवाना होणार आहे. 19 दिवस प्रवास करून मुंबईतील मंत्रालयावर धडकणार आहे. या पार्श्‍वभूमीवर विठ्ठल मंदिर परिसरात संचारबंदी तर शहरात जमावबंदीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी पारीत केले आहेत. तर पंढरपूरकडे येणारी […]

Continue Reading

शरद पवार मराठवाड्याच्या दौऱ्यावर तर अजितदादा पंढरपुर दौऱ्यावर

पंढरपूर : कोरोनाच्या परिस्थितीशी सामना करणाऱ्या महाराष्ट्रावर अस्मानी संकट कोसळले आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. विठुरायाच्या पंढरपूरनगरीमध्ये पाण्याचा हाहाकार पाहण्यास मिळाला आहे. पंढरपुरातील शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे दौऱ्यावर निघाले आहे. अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. एकीकडे ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी जोर धरत आहे. […]

Continue Reading

पंढरपुरात चंद्रभागा नदीकिनारी कुंभार घाटाची भींत कोसळून 6 जणांचा मृत्यू

पंढरपूर : पंढरपूर शहरात गेल्या 15 तासांपासून अखंड पावसाचा धुमाकूळ सुरू असताना आज दुपारी चंद्रभागा तीरावर असलेल्या कुंभार घाटाची भींत कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला आहे. रात्रभर मुसळधार पावसाने कुंभार घाटावरील नवीन घाटाचे बांधकाम कोसळल्याने ही दुर्घटना घडली. अग्निशमन दल व आपत्कालीन यंत्रणेने हे सर्व सहा मृतदेह दगड ढिगाऱ्याखालून बाजूला काढले आहेत. ठेकेदारावर गुन्हा दाखल […]

Continue Reading

नियम मोडण्यासाठीच आलो आहोत, आंदोलनाला जमलेल्या हजारोंच्या गर्दीचं प्रकाश आंबेडकरांकडून समर्थन पंढरपुरात आंदोलन

पंढरपुर : मंदिरं खुली करण्यासाठी आज विश्व वारकरी सेवा आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पंढरपुरात आंदोलन केलं जात आहे. आंदोलनात सहभागी होण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर पोहोचले असून यावेळी मोठ्या प्रमाणात समर्थकांनी गर्दी केली आहे. पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव मंदिराकडे जाणारे मार्ग बॅरिकेट्स लावून बंद केले आहेत. दरम्यान लोकांकडून बॅरिकेट्स तोडण्याचा प्रयत्न केला जात […]

Continue Reading

प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात पंढरपुरात आंदोलन

सोलापूर : पंढरपुरात वंचित बहुजन आघाडी आणि विश्व वारकरी सेनेच्या नेतृत्वात होणाऱ्या आंदोलनाची संभाव्य गर्दी पाहता पोलिसांमार्फत खबरदारी घेतली जात आहे. पंढरपूरच्या सर्व सीमा आणि विठ्ठल मंदीर परिसरात मोठा फौजफाटा पोलिसांमार्फत तैनात करण्यात आला आहे. मंदिराकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांवर लोखंडी बॅरेकेडिंग लावण्यात आले आहेत. उद्या रात्रीपर्य़ंत जवळपास 500 ते 600 पोलिसांचा फौजफाटा पंढरपुरात तैनात असणार आहे. […]

Continue Reading