भारतातील टॉप पाच भिकाऱ्यांची संपत्ती ऐकून व्हाल थक्क, मुंबईतील दोघांचा समावेश

मुंबई : जगातला प्रत्येक व्यक्ती आपलं घर चालवण्यासाठी आणि कुटुंबासाठी काम करत असतो. एखाद्या व्यक्तीची कमाई किती असेल याचा अंदाज साधारणता आपण त्याच्या लाईफस्टाईलवरुन (Lifestyle) ठरवतो. मात्र, काही लोकांची जीवनशैली पाहून तुम्ही चुकूनही अंदाज लावू शकणार नाही, की ते भिकारी आहेत किंवा भीक मागून उपजीविका करतात. काही भिकारी तर असेही आहेत, ज्यांची कमाई आणि संपत्ती […]

Continue Reading

आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील बंदी कायम, पुन्हा जाहीर झाली नवी तारीख

नवी दिल्ली : कोरोनाच्या  (Coronavirus) वाढत्या प्रसारामुळे आंतराराष्ट्रीय उड्डाणांवर (International Flights) पुन्हा एकदा 31 मार्चपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. विमान नियामक नागरी उड्डाण संचलनालयानं (DGCA) याबद्दलची माहिती दिली आहे. याआधी आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील बंदी 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत करण्यात आली होती. कोरोनाच्या प्रसारामुळे मागील वर्षी 23 मार्चपासून आंतरराष्ट्रीय उड्डाणं बंद आहेत. विमानन नियामक नागरी उड्डाण संचलनालयाच्या […]

Continue Reading

भर विधानसभेत तेजस्वी यादव यांचा शाळेतील वर्गमैत्रिणीशी झाला सामना; चर्चा ऐकून विरोधकही खूश

पटना : राजकीय आखाड्यात दंड थोपटत असताना प्रतिस्पर्धी संघात शाळेतली जुनी वर्गमैत्रिण भेटावी, अशावेळी काय होऊ शकतं, याचा प्रत्यय नुकताच बिहार विधानसभेत आला आहे. राजदचे तेजस्वी यादव हे नितिश कुमार सरकारला आणि भारतीय जनता पक्षाला घेरण्याच्या तयारीत असताना. तेजस्वी यादव यांना जुनी शाळेतील मैत्रिण भेटली आहे. यावेळी ते भर विधानसभेत आपल्या शाळेच्या आठवणीत रममाण झाले […]

Continue Reading

गलवानमधील माघारीनंतर सरकारचा मोठा निर्णय, चिनी कंपन्यांना भारतात व्यवसायाची मंजुरी!

मुंबई : गेल्यावर्षी जून महिन्यात पूर्व लडाखमध्ये असणाऱ्या गलवान खोऱ्यात भारतीय लष्कराबरोबच्या चकमकीत आमचे 5 जवान आणि अधिकारी मारले गेल्याचं चीनने अखेर मान्य केलं आहे. तर, सध्या पँगाँग लेक परिसरातून भारत आणि चीन या दोन्ही देशांनी सैन्य माघारी घेण्यास सुरुवात केल्याचीदेखील माहिती समोर आली आहे. त्यामुळे, आता भारतानंही नरमाईची भूमिका घेतली असून चिनी व्यवसायांना भारतात […]

Continue Reading

पगारवाढ मिळून सुध्दा हातात कमीच पडणार रक्कम; जाणून घ्या

नवी दिल्ली : एप्रिल महिना सुरू होताच नव्या अर्थिक वर्षात अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना पगारवाढ देतात. त्यामुळे एप्रिल महिन्याची चाहूल लागताच कर्मचाऱ्यांचे लक्ष पगारवाढीकडे असतं. परंतु आता केंद्र सरकारच्या नवीन नियमांमुळे टेक होम सॅलरीवरपरिणाम होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या नव्याने येत असलेल्या कामगार कायद्यामुळे तुमची सीटीसी नव्याने तयार केली जाणार आहे. या अंतर्गत कंपन्यांना कामगारांचे बेसिक […]

Continue Reading

लॉकडाऊन सुरु झाल्याच्या अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करणार, गृहमंत्री अनिल देशमुखांचा इशारा

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. सोशल मीडियावर फिरणाऱ्या अफवांमुळे नागरिकांची चिंता आणखी वाढताना दिसत आहे. लॉकडाऊनबाबत चुकीचे मेसेज, फोटो तयार करु सोशल मीडियावर अफवा पसरवल्या जात आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. याची दखल आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतली आहे. लॉकडाऊन सुरु […]

Continue Reading

शाहिद नव्हे या सेलिब्रिटीवर होतं पहिलं प्रेम; मिरानं उघड केलं आपलं गुपित

मुंबई : अभिनेता शाहिद कपूरची (Shahid Kapoor) पत्नी मिरा राजपूत (Mira Rajput) सिनेसृष्टीत कार्यरत नाही. परंतु चाहत्यांच्या चर्चेत मात्र कायम असते. शाहिदशी लग्न केल्यानंतर रातोरात प्रसिद्धी मिळालेल्या मिराचं फॅन फॉलोइंग आज शाहिदपेक्षाही अधिक आहे. तिचे फोटो आणि व्हिडीओज सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. अलिकडेच तिनं आपल्या चाहत्यांशी गप्पा मारण्यासाठी एक ऑनलाईन लाईव्ह चॅट सेशन केलं […]

Continue Reading

टोल नाक्यावर FASTag मध्ये पैसे असतानाही जर तो स्कॅन झाला नाही तर पैसे देण्याची गरज नाही

मुंबई : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) 15 फेब्रुवारीपासून सर्व टोल प्लाझावर (FASTag) अनिवार्य केला आहे. टोल प्लाझावर वाहनांच्या लागणाऱ्या रांगापासून सुटका करण्यासाठी ही योजना आणण्यात आली आहे. मात्र, प्रत्यक्षात यात तांत्रिक अडचणी येत असल्याने पूर्वीसारखाच वेळ जात असल्याचे काहींचा अनुभव आहे. यावर आता प्रशासनाकडून नवीन आदेश आला आहे. टोल नाक्यावर Fastag मध्ये पैसे असतानाही जर […]

Continue Reading

बलुचिस्तान प्रांतात पाकिस्तानी लष्करावर मोठा हल्ला; अनेक सैनिक जागीच ठार

कराची: बलुचिस्तान प्रातांत पाकिस्तानी लष्कराच्या जवानांवर आतंकवादी हल्ला करण्यात आला आहे. बलुचिस्तानातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी हा हल्ला करण्यात आला असून पाकिस्तान लष्कराची मोठी जीवितहानी झाल्याची बातमी समोर आली आहे. दोन्ही ठिकाणी झालेल्या हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराला निशाणा बनवण्यात आलं आहे. यामध्ये पाकिस्तान लष्कराचे पाच जवान मृत्यूमुखी पडले असून दोन सैनिक गंभीर जखमी झाले आहेत. फ्रंटियर कोरच्या […]

Continue Reading

इलेक्ट्रिक चारचाकी वाहन खरेदीवर सरकार देणार दीड लाखांचं अनुदान; रोड टॅक्सही होणार माफ

नवी दिल्ली: देशाची राजधानी दिल्ली लवकरच प्रदूषणमुक्त होऊ शकते. कारण अलीकडेच दिल्ली सरकारने स्विच मोहीम सुरू केली आहे. ज्यामध्ये विद्युत वाहनांच्या वापराला चालना देण्यासाठी मोहीम राबविली जात आहे. केजरीवाल सरकारच्या या उपक्रमामुळे राजधानीतील अनेक लोकांची इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्याकडे कल वाढला आहे. अशा परिस्थितीत दिल्लीचा सत्ताधारी पक्ष आप आदमी पार्टीने एक ट्वीट केलं आहे. ज्यामध्ये […]

Continue Reading