कोविड रुग्णालयात दाखल होण्याच्या नियमात बदल; मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय

नवी दिल्ली : कोरोनाची लक्षणं दिसल्यानंतर सुरुवातीला त्या रुग्णाची कोरोना चाचणी केली जाते. ही चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल केलं जातं. पण आता कोविड सेंटरमध्ये दाखल होण्यासाठी रुग्णाची कोरोना चाचणी बंधनकारक नसणार आहे. केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना रुग्णांना रुग्णालयात भरती होण्याच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. याबाबत नव्या गाइडलाइन्स […]

Continue Reading

जनधन खात्यात पैसे मिळाले की नाही? या नंबरवर मिस्ड कॉल देऊन घरबसल्या घ्या जाणून

नवी दिल्ली: देशात कोरोनाच्या  रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून दर दिवशी 4 लाखांपेक्षा अधिक रुग्ण आढळत आहेत. कोरोनाच्या या काळात जनधन खात्यांमध्ये वाढ झाली आहे. या कठीण काळात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी अत्यावश्यक कामांशिवाय बाहेर पडू नये, यासाठी सरकार आणि बँका ग्राहकांना सुविधा पुरवत आहेत. तुम्ही आता घरबसल्या तुमच्या जनधन खात्यातकिती पैसे आहेत हे माहीत […]

Continue Reading

16 वर्षांच्या तरुणांनाही लस देण्याची परवानगी द्यावी, अर्ज करत Pfizer ने केली मागणी

नवी दिल्ली: अमेरिकेची फार्मा कंपनी फायझरने त्यांची लस 16 वर्षांच्या तरुणांना देण्यात यावी यासाठी अर्ज केला आहे. ही लस फायझर आणि बायोएनटेक यांनी मिळून बनवली आहे. दोन्ही कंपन्यांनी अमेरिकेच्या फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनला 16 वर्ष आणि त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींवर लशीच्या वापरासाठी परवाना मिळवण्यासाठी अर्ज केला आहे. यापूर्वी ही लस केवळ 18 वर्ष आणि […]

Continue Reading

महाराष्ट्रात रुग्ण संख्या 50 लाखांजवळ, 10 जिल्ह्यांत ग्रोथ रेटमध्ये घसरण झाल्याने दिलासा

मुंबई : देशभरात कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश आहे. महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 54 हजारहून अधिक नवे कोरोनाग्रस्त आढळले असून 898 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात मागील अनेक दिवसांपासून दररोज आढळणाऱ्या कोरोना रुग्णांचा आकडा 50 हजारांवर आहे, नव्या आकड्यांसह राज्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 49 लाख 89 हजार 758 इतकी झाली आहे. आतापर्यंत 74 हजारहून […]

Continue Reading

कोरोना रुग्णांसाठी मोबाइलवर बुक होणार खाटा; नागरिकांसाठी या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुरू केलं APP

झारखंड : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा परिणाम देशातील सर्वांवर होत आहे. यामुळे राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात आहे. झारखंड राज्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्यात कोरोना रुग्णांना बेडची सुविधा मोबाइलवर उपलब्ध होऊ शकेल. यासोबतच व्हॉट्सअॅप क्रमांकावरही डॉक्टरांचा सल्ला मिळू शकेल. मुख्यमंत्री हेमंन सोरेन यांनी राज्यात वाढणाऱ्या संसर्गादरम्यान नागरिकांना तातडीने सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी हा […]

Continue Reading

बाबा, माझ्या उपचारासाठी खर्च केला तर पम्मीचं लग्न कसं होईल? ते शब्द ठरले अखेरचे; कोरोनाबाधित तरुणाचा मृत्यू

खनऊ : देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच मृतांचा आकडाही झपाट्यानं वाढत आहे. रुग्णांची ऑक्सिजन पातळी खालावत असल्यानं मोठा खर्चही करावा लागत आहे. अशात आर्थिक परिस्थिती चांगली नसलेल्या रुग्णांचे जास्तच हाल होत आहेत. अशीच एक हृदयद्रावक घटना आता समोर आली आहे. रुग्णालयात दाखल असलेल्या एका मुलानं चार मे रोजी संध्याकाळी आपल्या वडिलांसोबत फोनवरुन बातचीत केली. […]

Continue Reading

कोरोनाच्या लढाईमध्ये भारताला जगभरातून साथ

नवी दिल्ली : कोरोनाच्या महामारीने आता देशात हाहाकार माजवला आहे. आता रोजची रुग्णवाढ ही चार लाखांच्या घरात पोहोचली आहे. गेल्या काही दिवसांत देशभरात ऑक्सिजन आणि इतर साहित्यांचा तुटवडा जाणवत असून त्यामुळे हजारो रुग्णांचा जीव जात आहे. भारताच्या या संघर्षाला आता जागतिक स्तरावरून साथ मिळत असून अमेरिका, ब्रिटन सहित जवळपास 40 देशांतून मदतीचा ओघ सुरु झाला […]

Continue Reading

अजय देवगण उभारणार आणखी दोन कोविड रुग्णालये

मुंबई : कोविडशी दोन हात करण्यासाठी आता अनेक कलाकार पुढे येऊ लागले आहेत. एकिकडे सलमान खान, अक्षयकुमार, सुनील शेट्टी, सोनू सूद अशी मंडळी आपल्या परिने मदत करत असतानाच अजय देवगणही कुठेही गाजावाजा न करता कोविडसाठी मदत करत आहे. अभिनेता अजय देवगण आता मुंबईमध्ये दोन कोविड रुग्णालये उभारणार आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने शिवाजी पार्क परिसरातल्या मैदानावर […]

Continue Reading

उजनीच्या पाण्यासाठी पालकमंत्री दत्तात्रय भरणे मामांची बनवाबनवी

सोलापूर : सांडपाण्याच्या नावाखाली उजनी मधील 5 टीएमसी पाणी इंदापूरला नेण्याचा प्रयत्न होत असल्यामुळे सोलापूर जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. अशात पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची दोन विधाने या पाणीचोरीला पुष्टी देणारी समोर आल्याने आता भरणे मामा सोलापूर जिल्ह्याला मामा तर बनवत नाहीत ना असे म्हणायची वेळ आली आहे. मात्र, उजनीतील पाण्याबाबत जिल्ह्यातील शेतकरी संघटना आक्रमक […]

Continue Reading

Delhi NCT Act: दिल्लीची सत्ता आता नायब राज्यपालांच्या हाती एकवटली, NCT कायदा लागू

नवी दिल्ली : दिल्लीतील लोकनियुक्त सरकारचे अधिकार कमी करणाऱ्या आणि केंद्र सरकारच्या हातचा बाहुला असलेल्या नायब राज्यपालांच्या अधिकारात वाढ करणाऱ्या गव्हर्नमेन्ट ऑफ नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली (अमेन्डमेन्ट) अॅक्ट 2021 (GNCT Act) लागू झाला असून आता दिल्लीतील खरे सरकार हे नायब राज्यपालच असतील हे स्पष्ट झालं आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने एक परिपत्रक काढून 27 एप्रिलपासून हा […]

Continue Reading