कोरोना काळात मोदी सरकारचा मोठा दिलासा, 2 कोटींपर्यंतच्या रकमेवरील चक्रवाढ व्याज माफ

ताज्या घडामोडी देशविदेश

नवी दिल्ली :  कोरोनाच्या काळात आर्थिक गणित बिघडलेल्या कर्जदारांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. कोरोनाच्या काळात RBI ने लोन मोरेटोरिअम जाहीर केला होता.यामुळे नोकरी गमवलेल्या नागरिकांना मोठा फायदा मिळाला होता.पण बँकांनी या काळाच कर्जाच्या व्याजावर चक्रवाढ व्याज आकारण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय केंद्राने घेतल्यामुळे थकलेल्या EMI पेक्षा कितीतरी पटींनी जास्तच व्याजाचा बोजा ग्राहकांना बसला होता. पण आता दोन कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जाच्या रकमेवरील चक्रवाढ व्याज माफ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने दिला आहे. यामुळे लघू उद्योग आणि मध्यम उद्योगांना मोठा फायदा होणार आहे.

न्यायालयाने यासंदर्भात केंद्र सरकारला खडसवल्यानंतर केंद्र सरकारने प्रतिज्ञापत्र सादर करत व्याजाच्या रकमेवरील चक्रवाढ व्याज रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. चक्रवाढ व्याज माफ केल्यामुळे बँकांना मोठं नुकसान होणार आहे. पण त्याची भरपाई केंद्र सरकार देणार आहे. यासाठी संसदेत रितसर मंजुरी घेण्यात येईल, असं अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.

केंद्र सरकारने काय सर्वोच्च न्यायालयात काय दिली माहिती?

मोरेटोरियम मुदतीच्या 6 महिन्यांच्या व्याजातील चक्रवाढ व्याज माफ केलं जाणार आहे.

कर्ज घेतलेल्या व्यक्तीने मोरॅटोरियम सुविधा घेतली होती की नव्हती हे न पाहता सरसकट सर्व कर्जदारांचं चक्रवाढ व्याज माफ केलं जाणार आहे.

मार्च ते ऑगस्टदरम्यान ज्यांनी थकबाकी भरली आहे त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

कोरोनाच्या काळात नोकरी गमवलेल्या किंवा व्यवसायात मंदी आलेल्या सर्वच कर्जदारांसाठी ही अतिशय फायद्याची योजना आहे.  उद्योग क्षेत्रातील कर्जदारांसोबतच शैक्षणिक, गृहकर्ज, वाहनकर्ज,क्रेडिट कार्डाची थकबाकी आणि इतर कर्जदारांनाही याचा फायदा होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *