अमानुषतेचा कळस, छातीवर अगरबत्तीचे चटके देत केला बलात्कार

क्राईम पुणे

पिंपरी चिंचवड : कोरोनाच्या काळात भयंकर प्रकार पिंपरी चिंचवडमधून समोर आला आहे. लग्नाचं आमिष दाखवून 25 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा तरुण अनेक दिवसांपासून या तरुणीच्या मागे होता.

आरोपीनं तरुणीला आधी लग्न करण्याचं आमिषही दाखवलं. आरोपीनं तरुणीचे अश्लील फोटोही व्हायरल करण्याची सतत्यानं धमकी दिली. जेव्हा तरुणी आरोपीला भेटण्यासाठी गेली तेव्हा या आरोपीनं तरुणीवर  बलात्कार केला. बलात्कारादरम्यान त्यानं तरुणीच्या छातीवर अगरबत्तीचे चटके दिले.

तुझे टॉपलेस फोटो वडिलांना पाठवेन अशी आरोपीनं तरुणीला धमकी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या तरुणानं हातापायवर जखमी करून शिवीगाळ आणि मारहाण कऱण्याची धमकी दिल्याची तक्रारही वाकड पोलिसांनी फिर्यादीच्या जबाबावरून दाखल करून घेतली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आरोपीनं लग्नाचं आमिष  दाखवून तरुणीला बोलवून छातीवर अगरबत्तीचे चटके देत बलात्कार केल्याची फिर्याद तरुणीनं दिली आहे. या प्रकरणी वाकड पोलिसांकडून बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. राजेश पवार नावाच्या तरुणाचा या प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *