सोशल मीडियावरील मुद्द्यांची लढाई गुद्द्यावर

ताज्या घडामोडी सोलापूर

आंधळकर अन्नछत्रावर हल्ला प्रकरणी नगरसेवक चव्हाणसह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

बार्शी दि जनसत्य प्रतिनिधी

राजमाता इंदूताई आंधळकर अन्नछत्रावर हल्ला करून मारहाण केल्या प्रकरणी नगरसेवक अमोल चव्हाण सह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे यामध्ये नगरसेवक अमोल चव्हाण,चेतन चव्हाण नाथा मोहिते भगवान साठे,अतुल शेंडगे,रोहित अवघडे,प्रमोद कांबळे,बाबा सुनील वाघमारे रा सर्वजण लहुजी वस्ताद चौक बार्शी अशी दाखल करण्यात आलेल्या आरोपीची नावं आहेत सविस्तर माहिती अशी की, शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी  घरपट्टी नळपट्टी विरोधात दि ५ मार्च रोजी बार्शी नगरपालिकेवर मोर्चा काढण्यात येणार असून या मोर्चाद्वारे चोळी बांगड्या चा आहेर देणार असल्याचे फेसबुक लाईव्ह मध्ये सांगितले होते त्यावर तुम्ही काय चोळी बांगड्याचा आहेर  देता आम्हीच तुम्हाला चोळी बांगड्या घालून नाचवू अशी फेसबुक पोस्ट अमोल चव्हाण यांनी केली होती त्यानंतर आंधळकर यांच्या कार्यकर्त्यांनी अमोल चव्हाण याच्या विरोधात फेसबुकवर पोस्ट टाकल्या होत्या त्याचा राग मनात धरून दि  २ मार्च रोजी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास वरील आरोपींनी सोमवार पेठेतील आंधळकर अन्नछत्रावर दगडफेक करून आंधळकर यांचे पीए रॉनी सैय्यद यांच्यासह बापू तेलंग ,बादशहा बागवान,साजिद शेख,शरद घाडगे सूरज भालशंकर,मयूर शिनगारे या सर्वांना मारहाण करून गंभीर जखमी केले तसेच त्याठिकाणी असलेल्या मारुती मंदिरावर दगडफेक करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची तोडफोड केली तसेच अन्नछत्रातील सांबर,भात आदींची नासधूस करून सात हजार रुपयांचे नुकसान केले आहे अशी फिर्याद रॉनी उर्फ समीर सैय्यद रा शिवाजी आखाडा बार्शी याने दिली आहे याबाबत भा द वि ३२४,३२६,३२३ ३४ आदी प्रमाणे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेतयातील काही आरोपींना अटक करण्यात आली असल्याचे सांगितले आहे
 \\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\

या घटनेमुळे शहरातील सोमवार पेठ या मुख्य बाजारपेठेत अचानक गोंधळ निर्माण झाला होता आणि व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने बंद केली होती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *