औरंगाबाद : क्रेडिट कार्डचं बिल थकलं म्हणून एका महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याची संतापजनक घटना औरंगाबादमध्ये उघडकीस आली आहे. पीडित महिलेकडे एका नामांकित बँकेचं क्रेडिट कार्ड होतं. पण मागील दिवसांपासून त्यांनी क्रेडिट कार्डचं बिल भरलं नव्हतं. त्याच्या क्रेडिट खात्यावर एकूण वीस हजार रुपयांची थकबाकी होती. या पैशांच्या बदल्यात आरोपी कर्मचाऱ्यांनं महिलेकडे थेट शरीरसुखाची मागणी केली आहे. याप्रकरणी महिलेनं पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

खरंतर, औरंगाबाद येथील एका बँकेनं आपल्या ग्राहकांकडील थकीत कर्ज आणि हफ्ते वसुल करण्याचं काम एका थर्ड पार्टीला दिलं आहे. दरम्यान वसुली कंपनीच्या एका कर्मचाऱ्यानं क्रेडिट कार्डच्या बिलाच्या मोबदल्यात महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली आहे. याशिवाय आरोपीनं महिलेला शिवीगाळ देखील केल्याचा आरोप पीडित महिलेनं आपल्या तक्रारीत केला आहे.