गाडीची कागदपत्र अपडेट केली का? 31 डिसेंबरपर्यंत करून घ्या, अन्यथा भरावा लागेल दंड

ताज्या घडामोडी देशविदेश

नवी दिल्ली : जर तुमच्या गाडीसंबंधी कोणतीही कागदपत्र ड्रायव्हिंग लायसन्स, आरसी किंवा फिटनेस सर्टिफिकेट रिन्यू करायचं असल्यास हे काम 31 डिसेंबरपूर्वी पूर्ण करा. हे काम 31 डिसेंबरआधी पूर्ण न झाल्यास, 1 जानेवारीपासून दंड भरावा लागू शकतो. हा नियम कमर्शियल आणि प्रायव्हेट दोन्ही वाहनांवर लागू आहे. या नियमांत केवळ त्याच गाड्या सामिल आहेत, ज्याच्या कागदपत्रांची वैधता 1 फेब्रुवारी ते 31 डिसेंबरदरम्यान संपुष्ठात येते.

सरकारने 31 डिसेंबरपर्यंत वाढवली होती कागदपत्रांची वैधता –

कोरोना काळात सामन्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने मोटर व्हिकलसंबंधी सर्व कागदपत्रांची वैधता 31 डिसेंबर 2020 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला होता. त्याअंतर्गत फिटनेस सर्टिफिकेट, ड्रायव्हिंग लायसन्स, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (आरसी) सह प्रमुख कागदपत्रांचा समावेश आहे. परंतु आता वाढवण्यात आलेली ही वैधता संपणार आहे. त्यामुळे 31 डिसेंबरआधी गाडीचे संबंधित कागदपत्र अपडेट करावेत, अन्यथा दंड भरावा लागेल.

कमर्शियल वाहन मालकांचं अपील –

मिळालेल्या माहितीनुसार, कमर्शियल वाहन मालकांनी सरकारकडे आणखी काही सवलती देण्याचं आवाहन केलं आहे. व्यावहारिक अडचणींमुळे अद्यापही रस्त्यावर न येणाऱ्या वाहनांना आणखी काही दिलासा द्यावा, असं आवाहन सरकारला करण्यात आलं आहे. यात स्कूल बस ऑपरेटर्सचाही समावेश आहे.

स्कूल बस ऑपरेटर्सच्या समस्या –

याप्रकरणी स्कूल बस ऑपरेटर्सनी आपल्या समस्या सरकारकडे मांडल्या आहेत. लॉकडाउनपासून बंद असलेल्या स्कूल बस, अद्यापही शाळा सुरू न झाल्याने बंद आहेत. त्यामुळे शाळा सुरू होईपर्यंत त्यांना सद्यस्थितीत गाड्या ऑपरेट करू द्याव्यात, तसंच सरकारने कोणताही निर्णय घेण्यापूर्वी या सर्व मुद्द्यांचा विचार करावा, असं आवाहनही स्कूल बस ऑपरेटर्सकडून करण्यात आलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *