पाकिस्तानमध्ये महिला पत्रकाराची हत्या, 5 गोळ्या लागल्याने मृत्यू

ताज्या घडामोडी देशविदेश

नवी दिल्ली : पाकिस्तानमध्ये शनिवारी एका महिला पत्रकाराला गोळ्या घालून जीवे मारण्यात आल्याची घटना समोर आली आहे. शाहीना शाहीन असं सरकारी टीव्ही चॅनलमध्ये काम करणाऱ्या महिला पत्रकाराचं नाव होतं. शाहीना ही पाकिस्तान टीव्हीवर अँकर आणि रिपोर्टर होती. काही दिवसांपूर्वीच तिची बलूचिस्तानमधील तुर्बत इथं बदली करण्यात आली होती. शाहीना ही पहिली नाही तर याआधीही गेल्या वर्षी उरुज इक्बाल नावाच्या एका महिला पत्रकाराला गोळ्या झाडून ठार मारण्यात आलं होतं.

मिळालेल्या माहितीनुसार, 1992 पासून पाकिस्तानमध्ये आतापर्यंत 61 पत्रकारांची हत्या करण्यात आली आहे. तर सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे याच आठवड्यात एका मुलाखतीत पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानमधील पत्रकारांना सुरक्षित असल्याचं सांगितलं आहे. त्यानंतर अशी घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.शाहीनाने यापूर्वी इस्लामाबादमधील एका खासगी टीव्ही वाहिनीवर काम केलं होतं. यानंतर ती एका सरकारी टीव्ही चॅनेलमध्ये नोकरीला लागली. काही महिने इस्लामाबादमध्ये थांबल्यानंतर शाहीनाची तूरबत इथल्या बलुचिस्तानमध्ये बदली करण्यात आली. इथं ती एका स्थानिक मासिकाची संपादकही असल्याची माहिती समोर येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *