बोल्ड अंदाजात सनबाथचा आनंद घेताना दिसली मल्लिका शेरावत; फोटो व्हायरल

0
184

बॉलिवूड चित्रपटांतील बोल्ड भूमिकांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री मल्लिका शेरावत सध्या चित्रपटांपासून दूर असली तरी ती सोशल मीडियवर कायम सक्रिय असते. वयाच्या ४४ व्या वर्षी सुद्धा ती बोल्डनेस आणि फिटनेसच्या बाबतीत सुपरहिट अभिनेत्रींना सुद्धा तगडी टक्कर देत असते. नुकताच तिने स्विमिंग पूल मधील आपल्या बोल्ड अंदाजात सनबाथ घेतानाचे फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटोज सध्या प्रचंड व्हारयल होत असून सोशल मिडियावर सध्या गरमागरमीचे वातावरण निर्माण केलंय. यामधील तिचा हॉटनेसचा जलवा पाहून तुमचेही डोळे गरगरतील.

अभिनेत्री मल्लिका शेरावत सध्या पॅरीसमध्ये सुट्टी एन्जॉय करतेय. तिथे गेल्यानंतरचे वेगवेगळे फोटोज आणि व्हिडीओज ती आपल्या चाहत्यांसोबत शेअर करताना दिसून येतीय. नुकतंच तिने आता स्विमिंग सूटमधील काही फोटोज इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. स्विमिंग पूलाच्या किनारी डोळ्यांना गॉगल लावून ती समबाथचा मनसोक्त आनंद घेताना दिसत आहे. या फोटोंमध्ये ती बोल्ड अॅण्ड ब्युटीफूल दिसत आहे. ‘सनकिस्ड’ अशी कॅप्शन देत तिने हे सनबाथचे फोटोज शेअर केले आहेत.

मल्लिका शेरावतच्या या सेक्सी आणि बोल्ड फोटोजने सोशल मिडीयावर धुमाकूळ घातलाय. वयाच्या ४४ व्या वर्षी सुद्धा आजही ती किती बोल्ड आहे, हे तिने या फोटोंमधून दाखवलंय. यात आपली मादक आणि ग्लॅमरस अंदाज दाखवायला ती कुठेही कमी पडत नाही. तिचे हे फोटोज सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. तिच्या या फोटोला आतापर्यंत ६७ हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.

नेहमीप्रमाणेच तिचा हा बोल्ड अंदाज चाहत्यांना खूपच आवडला आहे. तिच्या या फोटोवर कमेंट करत चाहते तिच्या सौंदर्याचं कौतुक करताना दिसून येत आहेत. ‘वाह भारतीय संस्कृती…वरच्या भागाला दुप्पटाने झाकले’, ‘व्वा मॅडम, खूप दिवसांनी, तुमचा बिकिनी पिक्चर पाहून माझे मन आनंदी झाले.’ अशा वेगवेगळ्या कमेंट्स करत चाहत्यांनी तिचं कौतुक केलंय.

मल्लिका शेरावतने २००३ मध्ये इमरान हाश्मीसोबत ‘मर्डर’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं. यात इम्रान हाश्मीसोबतचा तिचा किसिंग सीन खूपच चर्चेत आला होता. एका मुलाखतीत तिच्या चित्रपटाबद्दल बोलताना मल्लिका शेरावत म्हणाली की, मर्डर चित्रपटानंतर तिला चांगले काम मिळणं बंद झालं होतं. मल्लिकाने बॉलिवूडबरोबरच हॉलिवूडमध्येही काम केलं आहे. मल्लिकाचे खरे नाव रीमा लांबा असं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here