मोहोळ,(तालुका प्रतिनिधी):
कोरोनामध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता काम करणाऱ्या पत्रकारांना महागड्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी आर्थिक कुवत नसल्याकारणाने शासनामार्फत चांगल्या हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यासाठी राखीव बेडची व्यवस्था करावी तसेच सर्व सुविधा तालुका व जिल्हा स्तरावर उपलब्ध करून देण्यात याव्यात,अशा मागणीचे निवेदन पत्र स्वतःच्या रक्ताने मोहोळ येथील पत्रकार सम्मेद शहा यांनी लिहून मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे.
कोरोना च्या काळामध्ये आपल्या जिवाची पर्वा न करता सामान्य माणसांच्या समस्या शासन दरबारी मांडणाऱ्या पत्रकारांची उपचारांसाठी होणारी घालमेल पाहून येथील ग्रामीण पत्रकार समवेत शहा येणे स्वतःच्या रक्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.यामध्ये ग्रामीण भागातील पत्रकार हा तुटपुंजा मानधनावर आपला जीव धोक्यात घालून काम करत आहे.अशा वेळी कोरोना महामारी चे संकट त्याच्यावर ओढवल्यास त्यांची आर्थिक परिस्थिती सक्षम नसल्याने त्यांना कोरोना झाल्यास चांगल्या हॉस्पिटल मधून त्याला उपचार व्हावेत. कोरोना महामारी वर प्रत्येक ठिकाणी जाऊन आपला जीव धोक्यात घालून वार्तांकन करत आहेत.अशा वेळी त्यांना जर कोरोना झाला तर त्यांची आर्थिक परिस्थिती गरिबीची आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम नसल्या मुळे महागाडी आणि चांगले उपचार घेऊ शकत नाही.त्यामुळे त्यांना चांगल्या हॉस्पिटलमध्ये चांगले उपचार मिळावेत.यासाठी शासनाने उपाययोजना करण्यात यावी त्याच बरोबर एखाद्या पत्रकाराचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास त्याला 50 लाख रुपयाची विम्याची रक्कम मिळवून द्यावी.अशा प्रकारचे पत्र मोहोळ तालुक्यातील पापरी येथील युवा पत्रकार सम्मेद शहा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले होते.त्या पत्राची दखल घेत लवकरच याबाबत निर्णय घेऊ, असा उलटपक्षी जबाब त्यांना आला असल्यामुळे त्यांनी मुख्यमंत्र्याचे आभार व्यक्त केले आहे.याबाबत लवकरच मुख्यमंत्री निर्णय घेणार असल्याचे शहा यांनी सांगितले.