सिताराम गुरव यांनी मोठयाने ओरडताच बिबट्याने त्यांच्याकडे पाहत गुरगुरत धुम ठोकली

सोलापूर

मोहोळ,(तालुका प्रतिनिधी): मोहोळ येथील शेतकरी सिताराम गुरव यांच्या शेतातील पाण्याच्या हौदावर गुरूवार दि १३ रोजी रात्रो ९ वाजता बिबट्या आढळुन आल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे . मोहोळ परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.
 याबाबत अधिक माहिती अशी की,मोहोळहुन    सोलापूरकडे जाणाऱ्या महामार्गापासुन अवघ्या शंभर मिटर अंतरावर सिताराम गुरव यांचे  शेतामध्ये घर आहे. शेतामध्ये जनावरांच्या गोठ्याजवळच बांधलेल्या पाळीव कुत्र्याला भाकरी टाकण्यासाठी गुरूवार रात्री ९ च्या दरम्यान सिताराम गुरव व त्यांची पत्नी घराबाहेर आल्यानंतर समोरच लाईटच्या उजेडात पाण्याच्या हौदावर बसलेला बिबट्या सिताराम गुरव यांना व त्यांच्या पत्नीच्या नजरेस पडला.बिबट्या दिसताच सिताराम गुरुव यांनी मोठयाने ओरडताच बिबट्याने त्यांच्याकडे पाहत गुरगुरत धुम ठोकली . शुक्रवार दि.१४ रोजी  सकाळी  प्रत्यक्ष घटनास्थळी वनपाल डी .डी . सांळुखे व वनपाल डी. डी . कांबळे यांनी  पाहणी केली असता सबंधित ठसे हे बिबट्याचेच असल्याचे त्यांनी खात्रीलायक सांगितले . दोन दिवसापूर्वी  याच  परिसरातील शिवाजी गुरव या शेतकऱ्याची बाहेर बांधलेली शेळीही  रात्री गायब  झाली होती .सोलापूर महामार्गापासुन अवघ्या शंभर मिटर अंतरावर मोहोळ शहरानजिक ,लोकवस्तीपासुन अतिशय जवळच बिबट्याचा वावर आढळल्यामुळे नागरिकामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे .    

सुकृत दर्शनी घटनास्थळी आढळुन आलेले ठसे हे विबटयाचेच  दिसून येत आहेत . त्या परिसरात गस्त लावण्यात आली आहे. या शिवाय नाईट पेट्रोलिंग सुरू केली असून शेतकऱ्यांना काही आढळून आल्यास तातडीने वनखात्याची संपर्क साधावा व शेतकऱ्यानी  सावधगिरी बाळगावी असे आवाहन मोहोळ तालुक्याच्या  वनपरिक्षेत्र अधिकारी जे एन पवार यांनी केले आहे .2 Attachments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *