भांडणे सोडवणाऱ्या दोघांवर कुकरीने वार, तिघांविरोधात गुन्हा दाखल

0
151
बार्शी दि जनसत्य प्रतिनिधी
भांडणे सोडवणाऱ्या दोघांवरही कुकरीने वार करणाऱ्या  ज्ञानेश्वर पवार ,सोनू पवार आणि बबलू पवार यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
अधिक माहिती अशी की , फिर्यादी विकी नागनाथ मोरे वय ३२ वर्ष रा भवानी पेठ बार्शी हा आणि त्याचा मित्र  सचिन अरुण नवगण हे दोघेजण आज सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता सोलापूर रोडवरील व्ही के मार्ट समोरील पटांगणात बोलत उभे होते त्यावेळी  रामकृष्ण हॉटेल जवळ भांडणे सुरू असल्याचा आवाज ऐकू आला म्हणून  दोघेजण सदर ठिकाणी गेले त्यावेळी  त्यांच्या गल्लीतील अनिल मोहन साळुंखे यांच्या टपरीवर  अनिल आणि पूर्वी गल्लीत राहायला असलेला ज्ञानेश्वर पवार यांची भांडणे सुरू होते म्हणून या दोघांनी भांडणे सोडवली त्यावेळी अनिल साळुंखे हा पळून गेला म्हणून ज्ञानेश्वर पवार याने या दोघांना धरा असे म्हणून त्यांच्या दोन मुलांना सांगितले सोनू आणि बबलू या दोघांनी लगेचच दोघांनाही पकडले आणि ज्ञानेश्वर पवार याने त्याच्या जवळील कुकरीचे कव्हर काढून दोघांवरही सपासप वार करून जखमी केले आहे सध्या या दोघांवर बार्शीतील सुविधा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत याबाबतभादवी ३२६,३२४,३२३ आदी प्रमाणे   गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कार्नेवाड करत आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here