प्रेयसीने लग्नाला नकार दिला म्हणून प्रियकराने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे प्रियकराने फेसबुक लाईव्ह करत आत्महत्या केली. ठाण्यात ही घटना घडली आहे. पोलीस सध्या याप्रकरणी तपास करत आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याणचा रहिवासी असणारा हा २७ वर्षीय तरुण स्थानिक रुग्णालयात वॉर्ड बॉय म्हणून काम करत होता. प्रेयसीने लग्नाला नकार दिल्याने त्याने हे टोकाचं पाऊल उचललं. फेसबुक लाईव्हमध्ये तरुणाने आपण गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंधात होतो अशी माहिती दिली आहे. तसंच आपण प्रेयसीला आर्थिक मदत केली होती असंही सांगत आहे.पोलिसांनी पीटीआयशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, दोघांमध्येही अनेकदा भांडणं होत होती. अशाच एक भांडणादरम्यान प्रेयसीने त्याला ‘जा आणि मर’ म्हटलं होतं. यानंतर त्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. सध्या तपास सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here