बाई आता काहीही बरळतेय”; अनुराग

Uncategorized मनोरंजन

X

अभिनेता सुशांत सिंह राजपुतच्या आत्महत्येमुळे बॉलिवूडमधील घराणेशाहीवर जोरदार टीका होत आहे. या टीकाकारांमध्ये अभिनेत्री कंगना रनौत सर्वात पुढे आहे. तिचे व्हिडीओ सध्या सर्वत्र चर्चेत आहेत. मात्र तिच्या या आक्रमक अवतारावर दिग्दर्शक अनुराग कश्यप याने निशाणा साधला आहे. ही बाई प्रसिद्धीसाठी आता काहीही बोलतेय, असं म्हणत त्याने टीका केली आहे.

काय म्हणाला अनुराग?

“काल कंगनाची एक मुलाखत पाहिली. कधी काळी ती माझी खुप चांगली मैत्रीण होती. मला प्रोत्साहन द्यायची. पण या नव्या कंगनाला मी ओळखत नाही. तिची मुलाखत पाहून मला धक्काच बसला.” अशा आशयाचं ट्विट अनुरागने केलं आहे.

त्यानंतर त्याने आणखी एक ट्विट केलं. “कंगनाच्या फॉलोअर्सने तिला आरसा दाखवायला हवा त्याऐवजी ते तिला डोक्यावर घेऊन नाचत आहेत. ती आता काहीही बोलतेय. तिच्या बोलण्यामध्ये काहीही तथ्य नाही. याचा शेवट इथेच होणार. खऱ्या कंगनाला मी ओळखतो त्यामुळे या नव्या कंगनाकडे मला आता पाहवत नाही.” अशा आशयाचे ट्विट करुन अनुरागने कंगनावर निशाणा साधला. त्याचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *