अक्षय कुमारचा ‘बेल बॉटम’ प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात; होतोय चोरीचा आरोप

0
56

मुंबई  बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आपला नवा चित्रपट घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या आगामी चित्रपटाचं नाव बेलबॉटम असं आहे. नुकताच या चित्रपटाचं नवं पोस्टर प्रदर्शित झालं. मात्र या पोस्टरमुळे चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे या पोस्टरवर हॉलिवूड चित्रपटाची नक्कल केल्याचा आरोप केला जात आहे. परिणामी या चित्रपटावर सध्या जोरदार टीका केली जात आहे.अक्षय कुमार आणि वाणी कपूर पहिल्यांदाच बेल बॉटम या चित्रपटाच्या निमित्तानं रुपेरी पडद्यावर एकत्र झळकणार आहे. वाणी सध्याच्या सर्वात ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. त्यामुळे प्रेक्षक या चित्रपटासाठी प्रचंड उत्सुक आहेत. दरम्यान नुकतंच चित्रपटातील मरजावा हे गाणं प्रदर्शित झालं. मात्र या गाण्याचं पोस्टर पाहून काही नेटकरी संतापले आहेत. ‘मरजावाँ’ गाण्याच्या पोस्टरमध्ये अक्षय आणि वाणी एका ट्रेनच्या दारावर उभं राहून बाहेर झोकवत एका इंटीमेट पोजमध्ये रोमान्स करताना दिसून येत आहेत. पण या पोजवर कॉपीकॅटचा आरोप केला जात आहे.2019 मध्ये एका सुप्रसिद्ध ट्रॅव्हल ब्लॉगरने क्लिक केलेला फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. ट्रॅव्हल ब्लॉगर कॅमिल ही एक डिजीटल क्रिएटर असून तिला आपल्या पतीसोबत वेगवेगळ्या ठिकाणी पर्यंटन करण्याची आवड आहे. जगभरात पर्यंटन करत असताना तिथल्या ठिकाणाहून फोटो क्लिक करून ती सोशल मीडियावर शेअर करत असते. २०१९ मध्ये श्रीलंकामध्ये गेलेली असताना तिने आपल्या पतीसोबत एक रोमॅण्टिक पोज देतानाचा फोटो शेअर केला होता. हा फोटो त्यावेळी प्रचंड व्हायरल झाला होता. तिच्या या फोटोवरून अक्षय कुमारच्या ‘बेल बॉटम’चं पोस्टर कॉपी केल्याचा आरोप सध्या नेटकरी मंडळी करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here