बायको रुसल्यानं जावयाचं सासुरवाडीत ‘शोले’ आंदोलन; विजेच्या टॉवरवर चढून तुफान राडा

0
125

जालना : नवरा-बायकोचं भांडण झाल्यानंतर दारुडा पती काय करू शकतो, याचा प्रत्यय नुकताच जालन्यातील जाफराबाद याठिकाणी आला आहे. बायकोसोबत भांडण झाल्याच्या रागातून एका तरुणानं महावितरणाच्या टॉवरवर r) चढून शोले स्टाईल आंदोलन  केलं आहे. विशेष म्हणजे या टॉवरवरून तब्बल 200 केव्ही क्षमतेचा वीजप्रवाह सुरू होता. जावईबापूच्या या तर्कट वागणूकीचा संपूर्ण गावकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागला आहे.

मंगेश शेळके असं या जावई तरुणाचं नाव आहे. त्याचं आपल्या बायकोसोबत आणि सासुरवाडीतील लोकांशी किरकोळ कारणातून वाद झाला होता. या वादातून तरुणानं रागाच्या भरात 220 केव्ही क्षमतेच्या टॉवरवर चढला होता. गावकऱ्यांनी अनेक विनवण्या केल्या, समजूत काढली, तरीही जावईबापू हट्टाला पेटले होते. ही सर्व घटना स्थानिक नागरिकांनी आपल्या मोबाइलमध्ये कैद केली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात वेगानं व्हायरल होतं आहे.बराच वेळी विनवणी करून जावई मंगेश शेळके खाली न उतरल्यानं गावकऱ्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. तरही तो टॉवरवरून खाली उतरायला तयार नव्हता, शेवटी गावकरी आणि पोलिसांनी चार तास समजूत घातल्यानंतर तो खाली उतरला. दारुच्या नशेत तरुणानं हे शोले आंदोलन केलं असल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. या घटेनाचा व्हिडीओ सोशल मीडियात वेगानं व्हायरल होतं असून नेटकऱ्यांकडून भन्नाट प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here