खासदार ओमराजेंचा बार्शी दौरा, कोरोना आढावा अन रेशनच्या काळ्या बाजारा बाबतीत ब्र शब्द नाही

सोलापूर


बार्शी दि (तालुका प्रतिनिधी) : उस्मानाबाद मतदार संघाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आज बार्शी तालुक्यातील जवळपास १९ गावांमध्ये दौरा करून करोना बाबतीत लोकांशी चर्चा करून आवश्यक त्या सूचना दिल्या असल्या तरी ओमदादा सारखे क्रियाशील खासदार रेशनच्या काळ्या बाजारा बाबतीत दिवसभरात एक शब्द सुध्दा बोलले नसल्याने बार्शीकर नागरिकांतून आश्चर्य व्यक्त केले जात आहे पनवेल पोलिसांच्या कारवाई तब्बल ११० टन रेशनचा तांदूळ जप्त करण्यात आला आहे बार्शीतील आडत दुकानातून लाखो रुपयांचा गहू तांदूळ याशिवाय उपलाई ठोगे ,वैराग आदि ठिकाणी  कारवाई करून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात रेशनचे धान्य जप्त करण्यात आले आहे बार्शीतील रेशनचा काळा बाजार संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत आला आहे त्यामुळे याबाबत खासदारांनी आढावा घेऊन आवश्यक त्या सूचना देने अपेक्षित होते मात्र आज दिवसभराच्या दौऱ्यात खासदारांनी रेशनच्या काळ्या बाजारा बाबतीत एक ब्र शब्द सुध्दा काढला नाही म्हणून याबाबतीत अधिक माहिती घेण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर यांचेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क झाला नाही म्हणून त्यांच्या दौऱ्यात असणारे त्यांचे पर्सनल सेक्रेटरी संतोष खोचरे यांचेशी संपर्क साधला असता खोचरे म्हणाले की आज जवळपास बार्शी तालुक्यातील १९ गावांना भेटी देऊन  ओम दादांनी लोकांशी संपर्क साधून करोनाला प्राधान्य देऊन या बाबतीत चर्चा केली लोकांच्या अडचणी ऐकून घेऊन त्याबाबतीत प्रशासनाला सूचना दिल्या आणि रेशनच्या काळ्या बाजाराच्या बाबतीत कोणीही बोलले नाहीत त्यामुळे विषय झाला नाही पण मी याबाबतीत ओम दादांना तुमचा निरोप देऊन फोन लावून देतो अशी माहिती दिली   कोविड आणि लॉक डाऊन काळात लोकांना मदत करणे आवश्यक होते असे असताना शासनाने गोरगरिबांसाठी दिलेल्या धान्यावर डल्ला म्हणजे प्रेताच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार आहे त्यामुळे याबाबतीत आज सर्व थरांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत त्यामुळे ओमराजे यांनी आज कोविड बरोबरच रेशनच्या बाबतीत आढावा घेऊन काळ्या बाजारा बाबतीत आवश्यक ती भूमिका मांडण्याची गरज होती कारण या काळ्या बाजारात बार्शी बरोबरच उस्मानाबाद जिल्ह्यातील काही भामट्यांचा समावेश आहे असो कोरोनाने विळखा घातलेल्या बार्शी तालुक्याचा आढावा घेण्यासाठी आज तालुक्यातील चारे, चुंब, आगळगाव, भोईरे, गातचीवाडी, धामणगाव, आरणगाव, धोत्रे, खामगाव, पानगाव,माणेगाव,सासुरे,राळेरास, शेळगाव, सर्जापुर,इरले, सुरडी, गुळपोळी यासह अनेक गावात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने गावास भेट देऊन सद्यस्थितीचा आढावा घेतला, यावेळी गावातील नागरिकांशी चर्चा केली. 
कंटेनमेंट भागातील नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना प्रशासकीय यंत्रणेस ओमराजेंकडून देण्यात आल्या. सार्वजनिक ठिकाणी मास्क, सॅनिटायझर वापर करावा, नागरिकांनी घाबरून न जात प्रशासनामार्फत देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख प्रविन काकडे, तहसीलदार संजय मुंडे, सहाय्यक गटविकास अधिकारी एस.जे.बुवा, सपोनि , ग्रामसेवक, तलाठी, आरोग्य कर्मचारी, पोलिस पाटील आशा कर्मचारी, ग्रा.प.कर्मचारी आदी संबंधित अधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
अविनाश यांचा सत्कार 
तालुक्यातील चुंब गावचे सुपुत्र आणि UPSC उत्तीर्ण अविनाश जाधवर यांचे अभिनंदन आणि सत्कारही ओमराजे यांनी केला. अविनाश यांचं यश तालुक्यातील तरुणांना प्रेरणादायी असल्याच ते म्हणाले.
माझ्या मतदारसंघातील एक शेतकऱ्याचा मुलगा जिल्हाधिकारी (IAS) झाला, त्याचा मला अभिमान आहे. गुण गौरवपूर्ण करणे हे माझे कर्तव्य आहे.  प्रतिकुल परिस्थितुन निर्माण झालेली व्यक्ती यशाची शिखरे गाठतात. तळागाळातील सर्वसामान्य, गोर गरिबांच्या अडचणी समजू शकतात. लोकप्रतिनिधीच्या जोडीला आपल्या भागातील अधिकारी असतील तर विकासाला चालना मिळते. तसेच त्यांच्या पुढील उज्वल वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या. 
यावेळी जि.प.सदस्य किरण मोरे,  प्रविन काकडे, उपतालुकप्रमुख राजकुमार पाटील, पांडुरंग गपाठ, विभाग प्रमुख नितीन मोहळे, अमोल करंडे, पोपट मूटकुळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.Attachments area

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *