बार्शी,डिजिटल बोर्ड लावण्यास मनाई

ताज्या घडामोडी महाराष्ट्र

नगरपालिकेच्या सभेत विषय मंजूर

बार्शी जनसत्य प्रतिनिधी

शहरातील आठ ठिकाणी डिजिटल बोर्ड लावण्यास बार्शी नगरपालिकेकडून मनाई करण्या बाबतचा ठराव मंजूर करण्यात आला आहे सविस्तर माहिती अशी की शहरातील विविध ठिकाणच्या डिजिटल बोर्डवरून यापूर्वी अनेकवेळा तक्रारी झालेल्या आहेत याबाबत शहर पोलीस निरीक्षक यांनी नगरपालिकेला वारंवार कळविले आहे त्याबाबत दि २६ रोजी झालेल्या पालिकेच्या विशेष सभेत विषय मंजूर करण्यात आला आहे यामध्ये शहरातील जुने पोलीस स्टेशन ते तहसिल कार्यालय  एसटी स्टँड चौक, श्री शिवाजी महाविद्यालय परिसर,पोष्ट चौक,भगवंत मंदिर परिसर,बार्शी नगरपालिकेच्या मालकीच्या सर्व इमारती आणि शॉपिंग सेंटर,प्राथमिक व माध्यमिक शाळा परिसर इत्यादी ठिकाणी या पुढे डिजिटल बोर्ड लावण्यास मनाई करण्यात आली आहे तसेच ही ठिकाणे वगळून डिजिटल बोर्ड लावण्यासाठी नगरपालिका बरोबरच पोलीस प्रशासनाचे नाहरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक राहणार आहे तसेच विनापरवाना बोर्ड लावण्याऱ्या व्यक्ती संस्था यांच्याविरोधात उक्त कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येणार आहे असेही म्हटले आहे त्यामुळे आता बार्शीतील वाढत्या आणि सवंग प्रसिद्धीला काही प्रमाणात तरी आळा बसणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *