संचारबंदी काळातबार्शीतील चौदा पैकी नऊ रस्ते बंद

ताज्या घडामोडी महाराष्ट्र

बार्शी  (तालुका प्रतिनिधी) कोविड प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार दि  १६ ते २६जुलै  संचारबंदी काळात बार्शीतील एकूण चौदा रस्त्या पैकी नऊ रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिली आहेयामध्ये शहरातील उपलाई रोड, अलीपुर रोड, परांडा रोड, कांदलगाव रोड, ताडसौन्दणे रोड, आगळगाव रोड, धस पिंपळगाव रोड,कासारवाडी रोड, फपाळवाडी रोड हे नऊ रस्ते लोकांना येण्याजाण्यासाठी बंद करण्यात आले आहेत तर कुर्डुवाडी, गाडेगाव, सोलापूर, तुळजापूर,आणि जामगाव हे रस्ते फक्त आपत्कालीन परिस्थितीत अत्यावश्यक,वैद्यकीय सेवा देणारी, शासकिय यंत्रणा, आणि शासनाने परवानगी दिलेल्या लोकांसाठी सुरू राहतील असे सांगितले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *