7 दिवस बँका राहणार बंद; पुढील आठवड्यापर्यंत होणार कामाचा खोळंबा

ताज्या घडामोडी देशविदेश

मुंबई: बँकेत (Bank) तुमचे एखादे महत्त्वाचे काम असेल तर आता तुम्हाला ते पुढील आठवड्यावर ढकलावे लागणार आहे. कारण आर्थिक वर्ष समाप्ती (Financial Year Ending) आणि सुट्ट्या (Holiday) यामुळे आजपासून म्हणजे 27 मार्च ते चार एप्रिल या कालावधीत देशभरातील सर्व बँका सात दिवस बंद राहणार आहेत. यामध्ये केवळ 30मार्च आणि 3एप्रिल हे दोन दिवसच बँकेतील कामकाज सुरू राहील. त्यामुळे बँकेत एखादं महत्त्वाचं काम असल्यास ते या दोन दिवसात करावं लागणार आहे किंवा ते पुढं ढकलावं लागणार आहे.

27 मार्च ते 29 मार्चपर्यंत बँकांना चौथा शनिवार आणि होळी यामुळं सुट्टी (Bank Holiday) आहे. त्यानंतर 30मार्च रोजी बँका सुरू असतील. फक्त पाटणा इथं यादिवशी बँका बंद असतील. त्यानंतर 31मार्चला बँकांना सुट्टी नाही. मात्र,आर्थिक वर्ष संपत असल्याने इयर एडिंगच्या (year ending) कामांसाठी बँक ग्राहकांसाठी बंद असेल. एक एप्रिल रोजीही नवीन आर्थिक वर्ष सुरू झाल्यानं बँकांमध्ये वार्षिक खाती बंद करण्याचं काम केलं जातं, त्यामुळं बँक ग्राहकांसाठी बंद असेल.

2 एप्रिल रोजी गुड फ्रायडेची सुट्टी असल्यामुळे बँका बंद राहतील. 3 एप्रिल रोजी शनिवारी बँका सुरू असतील. 4 एप्रिल रोजी रविवार असल्यानं बँकांना सुट्टी असेल. अशा रीतीनं चार एप्रिलपर्यंत फक्त दोन दिवस बँकेतील कामं ग्राहकांना करता येतील. तेव्हा त्यानुसार आपल्या कामाचं नियोजन करा.

बँकांच्या सुट्ट्यांची यादी :

27मार्च – महिन्यातील शेवटचा शनिवार असल्याने बँका बंद राहतील.

28मार्च – रविवार

29मार्च – होळीची सुट्टी असल्याने बँका बंद राहतील.

30मार्च – यादिवशी बँका सुरु राहतील,पण पाटण्यातील बँक व्यवहार बंदच राहतील.

31मार्च – आर्थिक वर्ष संपत असल्यानं बँका ग्राहकांसाठी बंद.

1एप्रिल –वार्षिक खाती बंद करण्याच्या कामामुळं सुट्टी

2एप्रिल – गुड फ्रायडेची सुट्टी

3एप्रिल – यादिवशी बँका सुरु राहतील.

4एप्रिल – रविवार आणि ईस्टर डेची सुट्टी

या सुट्ट्यांमुळं ग्राहकांना बँकेत पैसे जमा करणं, काढणं हे व्यवहार करता येणार नाहीत. पण एटीएम, मोबाइल बँकिंग, ऑनलाइन बँकिंग सेवा या काळात सुरू असतील. त्याद्वारे व्यवहार करता येतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *