राज्य सरकारकडून मुंबई बँकेतील कथित गैरव्यवहाराच्या चौकशीचे आदेश

ताज्या घडामोडी महाराष्ट्र

मुंबई : राज्य सरकारने मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कथित गैरव्यवहाराच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. सहकार विभागाच्या आयुक्तांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले असून त्यासाठी सहकार विभागातील तीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

गेल्या आर्थिक वर्षात बँकेला झालेला 48 कोटींचा तोटा तसंच भांडवलात झालेली घट आणि मनमानीप्रमाणे झालेल्या कर्जवाटपाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. दुसरीकडे मुंबई बँकेने मात्र ही नियमित तपासणी असल्याचा दावा करत कोणताही गैरव्यवहार झाला नसल्याचं म्हटलं आहे. मुंबई जिल्हा मध्यवर्धी सहकारी बँक ही भाजपच्या ताब्यात असून प्रवीण दरेकर बँकेचे अध्यक्ष आहेत.

सहकार विभागाकडून कोणकोणत्या बाबींची होणार चौकशी?

– बँकेला झालेल्या 48 कोटी रुपयांच्या तोट्याची
– बँकेने शासनाच्या हमीवर साखर कारखान्यांना दिलेल्या कर्जाची
– बँकेने दिलेल्या कॉर्पोरेट कर्ज खात्यांची
– गृहनिर्माण संस्थांना स्वयंपुनर्विकास धोरणांतर्गत दिलेल्या कर्जाची
– बँकेचे मुख्यालय आणि शाखांच्या दुरुस्तीवर झालेला खर्चाची
– मागील पाच वर्षात संगणकीय प्रणाली अद्ययावत करणे, संगणक खरेदी यासाठी केलेल्या खर्चाची
– भांडवलात घट होऊन ते 7.11 टक्के कसे झाले?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *