पतीने-पत्नीशी बळजबरीने ठेवले शरीरसंबंध; पती, नंणदसह ८ जणांवर गुन्हा

0
113
सोलापूर : पतीने पत्नीशी बळजबरीने शारीरिक संबंध ठेवून घरातील काही मंडळींनी पीडित महिलेचा मानसिक व शारीरिक त्रास देऊन छळ केल्याप्रकरणी पतीसह आठ जणांविरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पीडित महिलेने फिर्याद दिली आहे.
    याबाबत अधिक माहिती अशी की,पीडित महिलेचा रीतीरिवाजाप्रमाणे विवाह झाला होता.त्यानंतर काही दिवसांनी पीडित महिला व त्याच्या पतीसोबत सतत भांडण सुरू होते.पती रोज दारू पिऊन येऊन शिवीगाळ करीत त्याच्या पत्नीला आणि बहीणीला भांडत होता.त्यानंतर पीडित महिलेचा पती तिच्याशी शरीरसंबंध ठेवल्यानंतर आपल्या पत्नीला बाथरूमला पाठवत नव्हता.तसेच तू अवघड जागा धुवत जाऊ नको असे म्हणून दमदाटी करत होता.यामुळे पत्नीला अवघड जागी गाठ झाली होती.त्यावेळी पीडित महिलेच्या आईने औषध उपचार करून ऑपरेशन करून ती गाठ काढली.दरम्यान पीडित महिलेला डॉक्टरांनी थोडे दिवस शरीरसंबंध करू नका असे बजावून सांगितले असताना देखील पीडित महिलेच्या पतीने बळजबरीने शरीर संबंध ठेवले.याचा प्रचंड त्रास पत्नीला झाला व पतीच्या घरातील लोकांनी पीडित महिलेला लग्न झाल्यापासून मानसिक व शारीरिक त्रास देऊन छळ केला.या घटनेची नोंद जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात झाली असून,या घटनेचा पुढील तपास पोसई मांजरे हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here