अणदूरमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार जिल्ह्यात खळबळ, दोन आरोपी अटक एक फरार

ताज्या घडामोडी महाराष्ट्र


नळदुर्ग : तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे नववीत शिकणाऱ्या एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तीघा नराधमांनी सामूहिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले असून याप्रकरणी नळदुर्ग पोलिसांनी दोन नराधमांना अटक केली असून, एक आरोपी फरार झाला आहे. या घटनेमुळे उस्मानाबाद जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.पीडित अल्पवयीन मुलगी ही नराधम राहत असलेल्या घरा शेजारी वास्तव्यास होती. नराधम जबरदस्तीने तिच्या घरात शिरले. त्यांनी मुलीला बळजबरीने घरातून उचलून घेऊन गेले. व पीडितेवर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर नराधमांनी मुलीला पहाटे घरी सोडले. पालकांनी विचारपूस केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पीडित मुलीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पीडितेच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीनुसार तीघा नराधमांविरुद्ध नळदुर्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून सागर घोडके, मुकेश भोरे या आरोपीना अटक करण्यात आली असून तिसरा आरोपी आनंद घोडके अद्यापही फरार आहे. त्यांच्याविरुद्ध भादंवि ३७६ आणि पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सपोनि जगदीश राऊत हे करत आहेत…..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *