जबाबदार अधिकारीही बाधित क्षेत्रातून करताहेय ये.. जा जिल्हाधिकार्‍यांनी लक्ष घालण्याची होतेय मागणी

सोलापूर

मंगळवेढा (प्रतिनिधी )ः मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 57 वर पोहोचली आहे.महसूल प्रशासन,पोलिस प्रशासन, नगरपालिका प्रशासन आदी कोरोनाला रोखण्यासाठी विशेष प्रयत्न करीत असताना येथील विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मात्र सोलापूर,पंढरपूर,सांगोला या बाधित क्षेत्रातून दररोज ये जा करत असल्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता  नाकारता येत नसल्यामुळे या अधिकारी व कर्मचार्‍यांना आवरणार कोण असा सवाल जनतेमधून विचारला जात आहे.दरम्यान,काही अधिकारी येथे निवासी असताना जबाबदार अधिकारी मात्र बाधित क्षेत्रातून ये जा करीत असल्यामुळे या अधिकार्‍यांना नियम नाही का? असा सवाल करून जिल्हाधिकार्‍यांनी याची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी नागरिकांची आहे.
जिल्हयामध्ये मंगळवेढा तालुका कोरोनापासून सुरुवातीला चार हात दूर होता. बोराळे येथील एक व्यक्ती सोलापूर येथे जावून आल्याने पॉझिटिव्ह निघाल्याने मंगळवेढा येथे पॉझिटिव्ह रुग्णांची लागण सुरु झाली. आज ही संख्या 57 वर पोहोचली आहे. कोरोना संसर्ग साथीला अटकाव करण्यासाठी मंगळवेढयातील व्यापार्‍यांनी एक आठवडा स्वयंस्फुर्तीने बंद ठेवून कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न केला गेला.मंगळवेढा येथे तहसील कार्यालय,पंचायत समिती,पोलिस स्टेशन,प्रांत कार्यालय,भूमी अभिलेख कार्यालय,जिल्हा परिषद बांधकाम विभाग,सार्वजनिक बांधकाम विभाग,जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभाग,उजनी विभाग,तालुका कृषी कार्यालय,तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालय,विविध  राष्ट्रीयकृत बँका व पतसंस्था,औद्योगिक प्रशिक्षण संस्था,वखार महामंडळ आदी कार्यालये असून या कार्यालयातील काही  कर्मचारी हे बाधित क्षेत्रामधून मंगळवेढयात नोकरीसाठी ये जा करतात. या कर्मचार्‍यांवर नेमका अंकुश कोणाचा,संसर्गजन्य साथीचा फैलाव होत असताना यांना कोण रोखणार असा सवाल मंगळवेढा शहरवासियांमधून विचारला जातो आहे. या कामी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी लक्ष घालून बाधित क्षेत्रातून येणार्‍या कर्मचार्‍यांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी नागरिकांतून पुढे येत आहे.
———-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *