लाच मागितल्याप्रकरणी तहसीलदार मरोड यांची बदली?

0
87
अक्कलकोट तालुक्यात चर्चेला आले उधाण
सोशल मिडियावर व्हिडिओ झाला व्हायरल
सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटील यांच्या जनता दरबारामध्ये अक्कलकोट तालुक्याच्या तहसीलदार अंजली मरोड या शेतात रस्ता कामासाठी पोलीस पाटील यांच्या मार्फत लाच मागत असल्याचा आरोप करण्यात आला होता. या आरोपामुळेच तहसीलदार मरोड यांची बदली  सोलापूर शहरातील संजय गांधी निराधार योजनेच्या तहसीलदारपदी झाली असल्याची चर्चा अक्कलकोट तालुक्यात होत आहे.
      दरम्यान लाच मागितल्याची माहिती  तहसीलदार मरोड यांना मिळताच त्यांनी चपळगावातील सर्व ग्रामस्थांना बोलावून घेतले, पोलीस पाटील यांच्या समोर हा विषय खरा खोटा केला, त्यावेळी काही ग्रामस्थांनी जाणीवपूर्वक तहसीलदार अंजली मरोड यांची बदनामी करण्यासाठी तक्रार केल्याचं समोर आलं. ग्रामस्थांनी मरोड यांना आपली कोणतीही तक्रार नाही असे लिहून सही केल्याचे पत्र दिले आहे. मात्र चपळगावातील  ग्रामस्थांनी लाच दिली असल्याची माहिती देताना व्हिडिओ सोशल मिडिया ग्रुप वर व्हायरल झाल्यामुळे तहसीलदार मरोड यांची बदली करण्यात आल्याची चर्चा तालुक्यात होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here