बार्शी: गळ्यातील बदाम चोरताना गळा चिरून बाळाचा मृत्यू, चोरट्यांकडून बाळाच्या आईलाही मारहाण

क्राईम ताज्या घडामोडी सोलापूर


बार्शी (प्रतिनिधी)चोरीच्या उद्देशाने चोरट्यांनी आईसह तिच्या नऊ  महिन्याच्या चिमुकल्या च्या गळ्यातील दागिने चोरताना त्या चिमुकल्या ची आई जखमी झाली तर नऊ  महिन्याचे  बाळ मयत झाले असल्याची  घटना बार्शी तालुक्यातील वांगरवाडी या गावात आज भर दुपारी घडली. याबाबत पोलिसांनी पंचनामा केला असून बातमी पाठवे पर्यंत कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता. 
याबाबत सविस्तर वृत्त असे की,  बार्शी तालुक्यातील वांगरवाडी या गावांमध्ये राहणारे तुपे कुटुंबावर आज खूप मोठा आघात झाला आहे. भरदुपारी वांगरवाडी या गावात एका घरात अश्विनी स्वानंद तुपे ही महिला राहत असताना चोरीच्या उद्देशाने दोन इसम  तिच्या घरात घुसले आणि त्याच ठिकाणी झोपलेले  असलेले नऊ महिन्याचे बाळ सार्थक स्वानंद तुपे यांच्या डोक्यावरील घातलेले टकुचे त्या चोरांनी काढून त्या आईच्या तोंडात कोंबले आणि तिच्या गळ्यातील दागिने आणि मनी मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावून घेतले , तर तेथेच असणारे लहान बाळ सार्थक तुपे या नऊ महिन्याच्या बाळाच्या गळ्यात बदाम असलेले चोरट्यांना दिसले आणि त्यांनी ते गळ्यातून हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा  बदाम ओरबाडून  चोरत असताना या नऊ महिन्याच्या चिमुकल्याचा गळा चिरला गेला आणि तो मयत झाल्याची घटना घडली आहे.  ही घटना घडल्यानंतर तात्काळ बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे शिवाजी जायपत्रे आपल्या सहकारी पोलिसांसह गावात हजर झाले तसेच यावेळी वांगरवाडी या गावांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर पोलीस उपअधीक्षक डॉक्टर सिद्धेश्वर भोरे हेही गावात हजर झाले असून गावातील वातावरण निवडण्यासाठी प्रयत्नशील आहेत . भर दुपारी घडलेल्या या चोरीच्या घटनांमध्ये लहान चिमुकल्याचा जीव गेला असल्याने बार्शी तालुक्‍यात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *