‘बरं झालं मी आता जेलमधून बाहेर आहे’, कोरोनाच्या संकटात भुजबळांना आठवलं कारागृह

ताज्या घडामोडी महाराष्ट्र

नाशिक : ‘आर्थर रोड जेलमधील वास्तव्य भयानक आहे. बरं झालं या जेलमधील कैदी लवकर पॉझिटिव्हचे निगेटिव्ह झाले’ असं हे वक्तव्य आहे अन्न आणी खाद्य सुरक्षा मंत्री छगन भुजबळ यांनी केलं आहे. नाशिकमध्ये खास पोलिसांसाठी तयार करण्यात आलेल्या कोविड सेंटरच्या उदघाटन कार्यक्रमात ते बोलत होते.

नाशिक शहर आणी ग्रामीण दलात कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी हे कोविड सेंटर तयार करण्यात आलं आहे. यावेळी नुकताच पदभार स्वीकारलेल्या पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्या संकल्पनेतील हे सेंटर तयार करण्यात आलं आहे. यावेळी त्यांनी बोलताना आर्थर रोड कारागृहातील कैद्यांना कसं कोरोना मुक्त केलं हे त्यांनी सांगितलं. याचाच धागा पकडत भुजबळांना आपला आर्थर रोड कारागृहातील अडीच वर्षांचा काळ आठवला.यानंतर काय आपल्या खुमासदार शैलीत भुजबळांनी जोरदार बॅटिंग सुरू केली. आर्थर रोड जेलमध्ये क्षमतेपेक्षा जास्त कैदी होते. मीच अडीच वर्ष होतो. नशीब आता बाहेर आलो आहे. या जेलवर बोलायला माझ्यापेक्षा योग्य व्यक्ती दुसरी कोणती ? हा सवालही त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे कोविड सेंटरचा कार्यक्रम गाजला तो याच गोष्टींनी.

महापालिका आणि जिल्हा परिषद यांच्या सहकाऱ्याने तयार करण्यात आलेल्या या सेंटरमध्ये 100 सुसज्ज रुग्णांसाठी व्यवस्था करण्यात आली असून अवघ्या 2 दिवसात ऑक्सिजन यंत्रणा उभारण्यात आल्यानं अत्यंत जलद तयार झालेलं हे कोविड सेंटर मानलं जातं. कोविड सेंटरची गरज कितीही असली तरी एकही रुग्ण या सेंटरमध्ये न यावा हे बोलत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी टाळ्या वाजवून उस्फुर्त भावना व्यक्त केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *