मोहोळ परिसरामध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून बिबट्याची दहशत कायम

ताज्या घडामोडी सोलापूर

मोहोळ,(तालुका प्रतिनिधी):
मोहोळ परिसरामध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून बिबट्याची दहशत अजून ही कायम असून मोहोळ येथील घागरे वस्तीवर मोहन घागरे यांच्या शेतातील  शेळीवर बिबट्याने हल्ला करत सदरची शेळी ओढत नेण्याचा प्रयत्न केला.पंरतु जवळच शेतामध्ये काम करीत असणाऱ्या शेतकऱ्याने आरडाओरड केल्यावर मारलेली शेळी तिथेच टाकून बिबट्या ऊसामध्ये पळुन गेल्याची घटना दि.२२ ऑगस्ट रोजी दुपारी चारच्या दरम्यान मोहोळ शहराजवळ असणाऱ्या घागरे वस्तीजवळ घडली.                           
मोहोळ येथील शेतकरी मोहन घागरे हे आपल्या शेतामध्ये काम करित असताना अवघ्या ५० फुट अंतरावरून ऊसातुन बाहेर येत बिबट्याने शेतात चरायला  बांधलेल्या शेळीवर अचानक हल्ला करून शेळी ओढत नेत असताना मोहन घागरे मोठ्याने ओरडल्याने मारलेली शेळी जागेवरच सोडुन बिबट्या  पळुन गेला.तर शुक्रवार दि.२१ रोजी दुपारच्या सुमारास घागरे यांच्यावस्तीपासुन सुमारे दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या डॉ.अतुल कुर्डे यांच्या शेतातील शेळीच्या करडाला बिबट्याने  दुपारच्या सुमारास  उचलुन नेले आहे.मागील पंधरा दिवसापासुन मोहोळ, मलिकपेठ , खरखटणे, भोयरे, घाटणे हद्दीच्या शिवारात बिबट्याने पाळीव जनावरावर हल्ले केल्याने नागरिकामध्ये भिती निर्माण झाली आहे.            

………………………………………………………… 
शेळीवर झालेल्या हल्याची माहीती घेतली असुन वरीष्ठाच्या मार्गदर्शनाखाली ने  मृत शेळीचा पंचनामा करून संबधित शेतकऱ्यास शासनाच्या वतीने आर्थीक मदत मिळवुन देण्याचा प्रयत्न करण्यात येईल.सध्या पावसाचे दिवस असुन बिबट्याचा नेमका शोधण्यासाठी अडथळे येत आहेत.तरी नागरिकांनी न घाबरता आपल्या वस्तीवर पाळीव जनावरांची योग्य ती काळजी घ्यावी. 
सचिन कांबळे-वनरक्षक

……………………………………………………………………

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *